टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका होणार आहे. ही एकदिवसीय मालिकाही 3 सामन्यांची असणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर चरित असालंकाकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या मालिकेला 2 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. हे सर्व सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया एकदिवसीय मालिकेतील सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया एकदिवसीय मालिकेतील सामने मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येतील.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.
पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
दुसरा सामना, 4 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
तिसरा सामना, 7 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरित असलंका (कॅप्टन), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदु मेंडिस, जेनिथ लियानगे, निशान मदुश्का, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेल्लालगे, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, अकिला धनंजय, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना आणि असिथा फर्नांडो.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.