Video : W,W,W…! आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाच्या टप्प्याला धार, हॅटट्रीक घेत उडवली दाणादाण
श्रीलंकेचा गोलंदाज नुवान थुशाराने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी20 सामन्यात थुशाराने कमाल केली. हॅटट्रीक घेत बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं. श्रीलंकेने बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवला.
मुंबई : श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धची टी20 मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज घेऊन बांगलादेशने हा निर्णय घेतला असावा. पण बांगलादेशचा हा निर्णय चुकला. श्रीलंकेने 20 षटकात 7 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान बांगलादेशला काही गाठता आलं नाही. बांगलादेशचा संपूर्ण संघ 19.4 षटकात 146 धावांवर तंबूत परतला. श्रीलंकेने बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नुवान थुशाराने भेदक गोलंदाजी केली. बांगलादेशची दाणादाण उडवून दिली. नुवान थुशाराने 4 षटकात 20 धावा देत पाच गडी बाद केले. इतकंच काय तर एक षटक निर्धाव टाकलं. तसेच एका षटकात हॅटट्रीक घेऊन आपल्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं.
श्रीलंकेच्या कर्णधाराने संघाचं चौथं षटक नुवान थुशारा याच्याकडे सोपवलं. पहिलंच षटक टाकणाऱ्या नुवानने पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर नजमुल हुसैन शांतोचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेला तौहिद हृदोय काही खास करू शकला नाही. आला तसाच माघारी परतला. नुवानने त्याचाही त्रिफला उडवला. तिसऱ्या चेंडूवर महमुदुल्लाह आला होता त्याला काही नुवानचा चेंडू कळला नाही आणि त्याचा पायवर आदळला. जोरदार अपील करण्यात आलं आणि पंचांनी बाद दिलं. पण महमुदुल्लाहचा काही विश्वास बसला नाही आणि त्याने रिव्ह्यू घेतला. पण त्यात नुवानच्या बाजूने निकाल लागला.
HAT-TRICK FOR NUWAN THUSARA…!!!!
Mumbai Indians fast bowlers for IPL 2024 are Bumrah, Coetzee, Thusara, Madhushanka, Madhwal, Behrendorff. 🔥pic.twitter.com/bYfbH416d2
— Johns. (@CricCrazyJohns) March 9, 2024
नुवानला त्याच्या या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. नुवान सामन्यानंतर म्हणाला की, ‘मी लय आणि खेळ पाहून आनंदी झालो आहे. मी पहिल्यांदाच हॅटट्रिक घेतली आहे आणि देशासाठी हे करून खेळ जिंकल्याचा मला आनंद आहे.’
नुवान थुशाराच्या भेदक गोलंदाजीचा अंदाज यापूर्वीच मुंबई इंडियन्सला आला होता. त्यामुळेच मिनी ऑक्शनमध्ये थुशारासाठी मुंबई इंडियन्सने 4.80 कोटी रुपये मोजले होते. आता मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला आणखी धार मिळणार आहे. जसप्रीत बुमराहला नुवान थुशाराची साथ मिळणार आहे.