Virat Kohali : आता बस! 2-3 सामने ब्रेक घे, मोहम्मद अझरुद्दीनचा विराटला सल्ला, विराट ऐकणार का?
विराट कोहली हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर त्याला एक महत्वपूर्ण सल्ला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने दिला आहे.
मुंबई : विराट कोहलीची (Virat Kohali) बॅट बऱ्याच दिवसांपासून खवळली आहे. कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. पण जवळपास तीन वर्षांपासून कोहली त्याचा जुना रंग परत मिळवू शकलेला नाही. शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) सामन्यातही कोहलीची कामगिरी खराब होती. पहिल्याच चेंडूवर तो खाते न उघडता बाद झाला. शनिवारी झालेल्या या सामन्यात संघाचे उर्वरित फलंदाजही फ्लॉप ठरले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संपूर्ण संघ 68 धावांत गारद झाला. यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. अझरुद्दीनला वाटतं की विराट कोहली खूप क्रिकेट खेळला आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बराच ब्रेक घेतला आहे असे ज्यांना वाटते त्यांच्या मतापेक्षा हे वेगळं आहे. विराट कोहलीने स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी २-३ सामन्यांचा ब्रेक घ्यावा, असं अझहरला वाटते. यामुळे तो अपयशाचा विचार करणार नाही आणि सकारात्मक क्रिकेट खेळू शकेल. पण, आता विराट ऐकणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
अझरुद्दीन नेमकं काय म्हणाला?
विराटला सल्ला देताना अझरुद्दीन म्हणाला की, ‘खरं तर मला वाटतं की तो खूप क्रिकेट खेळला आहे. मला माहित आहे की, अनेक लोक म्हणतात की त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुरेसा ब्रेक घेतला आहे. पण जर तुम्ही सतत आयपीएल खेळलात तर परिणाम होईल. मला वाटते की त्याचे पाऊल खूप कमी झाले आहे. एक खेळाडू म्हणून किंवा माणूस म्हणून, जेव्हा मी त्याला खेळताना पाहतो तेव्हा मला वाटते की त्याने 2-3 सामन्यांचा ब्रेक घ्यावा आणि स्वतःला ताजेतवाने करावे. जर एखादा खेळाडू धावा काढत नसेल तर त्याच्यावर पुढील सामन्यात धावा करण्याचे दडपण असते आणि जर तो अपयशी ठरला तर हे चक्र सुरूच राहते. तो पुढे म्हणाला की विराट कोहलीच्या क्षमतेबद्दल शंका नाही पण प्रत्येक खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत ब्रेक हवा असतो. अझरुद्दीनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विराटचे फूटवर्क योग्य नव्हते याकडे लक्ष वेधले, त्यामुळे मार्को येनसनचा चेंडू त्याच्या बॅटच्या काठाला लागला आणि तो दुसऱ्या स्लिपमध्ये झेलबाद झाला.’
दडपण पेक्षा ब्रेक घ्या
अझर म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही धावा करत नसता तेव्हा तुमच्यावर पुढच्या सामन्यात धावा करण्याचे दडपण असते आणि ते पुढे जात असते. पण जेव्हा तुम्ही दोन-तीन सामन्यांचा ब्रेक घेता तेव्हा तुमचे मन ताजेतवाने होते. तुम्ही आरामात बसा आणि टीमसोबत मजा करा. विराट हा खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या क्षमतेवर शंका नाही. पण त्याचा पुढचा पाय पुढे गेला नाही आणि जेव्हा चेंडू स्विंग होत असेल तेव्हा तुम्ही अडचणीत येऊ शकता.
इतर बातम्या
Cm Uddhav Thackeray : झुकेंगे नहीं म्हणणाऱ्या फायरब्रँड आजीला मुख्यमंत्री भेटणार, सोशल मीडियावरही जो
Video : कुणाला भेटायचंय त्यांना भेटा, धमक्या देऊ नका- संजय राऊतरदार हवा