Stuart Broad : ‘मी जे काही झालो ते युवराज सिंहमुळे’; ज्याच्यामुळे झाला ‘झिरो’ त्यालाच सर्व क्रेडिट!

| Updated on: Jul 31, 2023 | 3:33 PM

Stuart Broad Retirement : अॅशेस मालिकेमधील पाचव्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी ब्रॉडने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याची घोषणा केली आहे. निवृत्ती घेतलेल्या ब्रॉडने टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंहला क्रेडिट दिलं आहे. 

Stuart Broad : मी जे काही झालो ते युवराज सिंहमुळे; ज्याच्यामुळे झाला झिरो त्यालाच सर्व क्रेडिट!
Follow us on

मुंबई : इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये. कसोटीमध्ये ६०० पेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या ब्रॉडने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे.  अॅशेस मालिकेमधील पाचव्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी ब्रॉडने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याची घोषणा केली आहे. निवृत्ती घेतलेल्या ब्रॉडने टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंहला क्रेडिट दिलं आहे.

काय म्हणाला ब्रॉड?

युवराज सिंहने मारलेल्या सहा सिक्सनंतरचा तो दिवस खूप कठिण होता. त्यावेळी मी वय २१ आणि २२ वर्षांचा होतो आणि मला खूप काही शिकायला मिळालं. माझी आंतरराष्ट्रीय कारकिर्द कमी राहिली होती पण मी खूप तयारी केला आणि मला मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी बळ मिळालं आल्याचं स्टुअर्ट ब्रॉडने म्हटलं आहे.

प्रत्येक खेळाडूच्या जीवनामध्ये चढ उतार आलेले पाहायला मिळतात. खराब कामगिरीचा भविष्यातील सामन्यांवर काही परिणाम होऊ द्यायचा नाही. 15-16 वर्षांच्या कारकिर्दीत चांगल्यापेक्षा जास्त वाईट दिवस असतात. त्यासाठी तुम्हाला त्याला सामोरं जावं आवश्यक आहे. कारण तुम्ही अशा दिवसांना सामना केला तर तुमच्यासाठी चांगले दिवस येणार असल्याचं स्टुअर्ट ब्रॉडने सांगितलं.

दरम्यान, २००७ साली टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड-भारत सामन्यामध्ये युवराज सिंह आणि प्लिंटॉफमध्ये झालेल्या वादानंतर युवीने रागारागात ब्रॉडला सहा सिक्सर लावत इतिहास रचला होता. स्टुअर्ट ब्रॉडने १६७ कसोटी सामन्यांमध्ये ६०२ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडसाठी ब्रॉड आणि जेम्स अँडडरसन हे दोन असे खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंत इंग्लंडसाठी नियमितपणे कसोटी क्रिकेट खेळत आपली दहशत कायम ठेवली आहे.