Stuart Broad ने रचला असा विक्रम जो ठरवूनही मोडता नाही येणार, ठरला जगातील एकमेव खेळाडू!
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये ब्रॉड पाचव्या स्थानी आहे. क्रिकेट कारकिर्दीमध्ये ब्रॉडने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यामध्ये एक असा विक्रम आहे जो परत कधी मोडला जावू शकत नाही.
मुंबई : इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कसोटी क्रिकेट खेळत असलेल्या ब्रॉडने आता थांबण्याचा निर्णय घेतलाय. अॅशेसमधील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यामध्ये ब्रॉडने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये ब्रॉड पाचव्या स्थानी आहे. क्रिकेट कारकिर्दीमध्ये ब्रॉडने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शेवटला एक असा विक्रम आहे जो परत कधी मोडला जावू शकत नाही.
स्टुअर्ट ब्रॉडचा कधीही मोडला न जाणारा विक्रम:-
स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजीला आला तेव्हा त्याने पहिल्याच चेंडूवर खणखणीत सिक्सर मारला. त्यानंतर बॉलिंग करताना आपल्या शेवटच्या चेडूंवर विकेट घेतली. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. ब्रॉडचा हा विक्रम कायम लक्षात राहणारा आहे. ब्रॉडच्या या विक्रमाची भविष्यात एखादा खेळाडू बरोबरू करू शकतो पण विक्रम मोडू शकत नाही.
ब्रॉडने दुसऱ्या डावातील ८१ व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर सिक्कर मारला होता. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला ब्रॉडने कडक सिक्सर मारलेला. त्यानंतर बॉलिंगवेळी कीपर अॅलेक्स कॅरीला आऊट करत इतिहास रचला. या विकेटसह कसोटी क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉडने ६०४ विकेट्सड पूर्ण केल्या आहेत. ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. ब्रॉडने टेस्टमध्ये १ शतक आणि १३ अर्धशतकांसह ३ हजार ६५६ धावा केल्या आहेत.
पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यामधील तिसऱ्या दिवशी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. क्रिकेट चाहत्यांना ब्रॉडच्या या निर्णयाने धक्का बसला होता. ब्रॉडने अचानक निवृत्ती जाहीर केल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती.
दरम्यान, इंग्लंडने या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधत ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्यापासून रोखलं. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३८४ धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ ३३४ धावांवर ऑलआऊट झाला.