Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Hazare Trophy Final 2023 : हरियाणासाठी मॅचविनर तर राजस्थानसाठी ‘हा’ खेळाडू ठरला घातक

Vijay Hazare Trophy Final man of the Match : यंदा विजय हजारे ट्रॉफीवर हरियाणा संघाने पहिल्यांदा नाव कोरत इतिहास रचला. संपूर्ण ट्रॉफीमधील सामन्यांमध्ये आणि फायनल सामन्यात एका खेळाडूच्या बेस्ट प्रदर्शनामुळे त्यांना हे यश गाठता आलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोण आहे जाणून घ्या.

Vijay Hazare Trophy Final 2023 : हरियाणासाठी मॅचविनर तर राजस्थानसाठी 'हा' खेळाडू ठरला घातक
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 11:29 PM

मुंबई : यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी 2023 मध्ये हरियाणा संघाने फायनलमध्ये राजस्थान संघाचा पराभव केला आहे. फायनल सामन्यात 30 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. राजस्थान संघाची टॉप ऑर्डर फेल गेल्याने हा सामना गमवावा लागला. राजस्थान संघाच्या शेवटच्या पाच विकेट अवघ्या 57 धावांच्या आतमध्ये गेल्या. राजस्थानसाठी हरियाणा संघाचा एक खेळाडू घातक ठरला. एकट्या खेळाडूने हरियाणाच्या विजयाचा मार्ग सोपा केला.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सुमित कुमार आहे. सुमित कुमार हा ऑल राऊंडर खेळाडू आहे. हरियाणा संघाच्या विजयात सुमितने महत्त्वाची भूमिका निभावली. पठ्ठ्याने शेवटला खेळताना १६ चेंडूत नाबाद २८ धावांची खेळी केली. यामध्ये  त्याने १ षटकार तर ४ चौकार मारले. या खेळीमुळे हरियाणा संघ 287 धावांपर्यंत मजल मारू शकला.

बॅटींगमध्ये कमाल दाखवल्यार गड्याने बॉलिंगमध्येही चमकदा कामगिरी करून दाखवली. सुरूवातीच्या तीन विकेट घेत त्याने राजस्थान संघाला बॅकफूटला ढकललं. सुमितने राम मोहन चौहान, महिपाल लोमरोर, दीपक हुडा यांना आऊट करत हरियाणाच्या विजयाचा पाय रचला. फायनल सामन्याचा सामनावीर म्हणून त्याला गौरवण्यात आलं. तर मालिकावीर म्हणूनही त्याची निवड करण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुमितने १८ विकेट आणि १८३ विकेट घेतल्या.

हरियाणा (प्लेइंग इलेव्हन): युवराज सिंग, अंकित कुमार, हिमांशू राणा, निशांत सिंधू, रोहित परमोद शर्मा (w), राहुल तेवतिया, अशोक मेनारिया (C), सुमित कुमार, हर्षल पटेल, अमित राणा, अंशुल कंबोज.

राजस्थान (प्लेइंग इलेव्हन): अभिजीत तोमर, राम मोहन चौहान, महिपाल लोमरोर, दीपक हुडा (C), करण लांबा, कुणाल सिंग राठोर (W), राहुल चहर, अनिकेत चौधरी, अराफत खान, खलील अहमद, कुकना अजय सिंग

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.