मुंबई : यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी 2023 मध्ये हरियाणा संघाने फायनलमध्ये राजस्थान संघाचा पराभव केला आहे. फायनल सामन्यात 30 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. राजस्थान संघाची टॉप ऑर्डर फेल गेल्याने हा सामना गमवावा लागला. राजस्थान संघाच्या शेवटच्या पाच विकेट अवघ्या 57 धावांच्या आतमध्ये गेल्या. राजस्थानसाठी हरियाणा संघाचा एक खेळाडू घातक ठरला. एकट्या खेळाडूने हरियाणाच्या विजयाचा मार्ग सोपा केला.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सुमित कुमार आहे. सुमित कुमार हा ऑल राऊंडर खेळाडू आहे. हरियाणा संघाच्या विजयात सुमितने महत्त्वाची भूमिका निभावली. पठ्ठ्याने शेवटला खेळताना १६ चेंडूत नाबाद २८ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १ षटकार तर ४ चौकार मारले. या खेळीमुळे हरियाणा संघ 287 धावांपर्यंत मजल मारू शकला.
बॅटींगमध्ये कमाल दाखवल्यार गड्याने बॉलिंगमध्येही चमकदा कामगिरी करून दाखवली. सुरूवातीच्या तीन विकेट घेत त्याने राजस्थान संघाला बॅकफूटला ढकललं. सुमितने राम मोहन चौहान, महिपाल लोमरोर, दीपक हुडा यांना आऊट करत हरियाणाच्या विजयाचा पाय रचला. फायनल सामन्याचा सामनावीर म्हणून त्याला गौरवण्यात आलं. तर मालिकावीर म्हणूनही त्याची निवड करण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुमितने १८ विकेट आणि १८३ विकेट घेतल्या.
हरियाणा (प्लेइंग इलेव्हन): युवराज सिंग, अंकित कुमार, हिमांशू राणा, निशांत सिंधू, रोहित परमोद शर्मा (w), राहुल तेवतिया, अशोक मेनारिया (C), सुमित कुमार, हर्षल पटेल, अमित राणा, अंशुल कंबोज.
राजस्थान (प्लेइंग इलेव्हन): अभिजीत तोमर, राम मोहन चौहान, महिपाल लोमरोर, दीपक हुडा (C), करण लांबा, कुणाल सिंग राठोर (W), राहुल चहर, अनिकेत चौधरी, अराफत खान, खलील अहमद, कुकना अजय सिंग