मूर्ख…! ऋषभ पंतचा तो शॉट पाहून सुनील गावस्कर भडकले, समालोचन करताना काढले वाभाडे

भारताला चौथ्या कसोटी सामन्यात संकटातून काढण्यात नितीश कुमार रेड्डीला यश आलं आहे. पण ऋषभ पंतची विकेट पडल्यानंतर चित्र काही वेगळं होतं. भारतावर फॉलोऑनसह पराभवाची नामुष्की होती. अशा स्थितीत ऋषभ पंतने खेळलेला शॉट पाहून सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला.

मूर्ख...! ऋषभ पंतचा तो शॉट पाहून सुनील गावस्कर भडकले, समालोचन करताना काढले वाभाडे
Follow us
| Updated on: Dec 28, 2024 | 10:47 AM

भारत आणि ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना आता रंजक वळणावर आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल जोडीची भागीदारी काही अंशी तारक ठरली. पण त्यानंतर शेवटी एका पाठोपाठ एक विकेट पडल्याने टीम इंडिया अडचणीत आली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 5 विकेट गेल्या होत्या. तसेच ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा ही जोडी होती. त्यामुळे या जोडीकडून फार अपेक्षा होत्या. पण या जोडीने काही खास केलं नाही. ऋषभ पंत ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून सुनील गावस्कर यांचा संताप झाला. लाईव्ह समालोचनावेळी सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंतच्या हलगर्जीपणाचे वाभाडे काढले. ऋषभ पंत मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात 37 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. यावेळी त्याने 3 चौकार मारले होते. पण मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट देऊन बसला. नाथन लायनच्या हाती झेल देऊन बाद झाला.

ऋषभ पंतने निवडलेला शॉट पाहून समालोचन करणाऱ्या सुनील गावस्कर यांना राग अनावर झाला. ऋषभ पंतने वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडच्या चेंडूवर फाईन लेगच्या वरून पिक अप रँप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हा शॉट ऋषभ पंत कायम खेळतो. पण यावेळी हा शॉट खेळताना चूक झाली. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. एकदा फटका चुकल्यानंतर पुन्हा दुसऱ्या चेंडूवर ऑफ स्टम्प जवळ येऊन रँप शॉट खेळला. पण यावेळी चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागत डीप थर्म मॅनकडे गेला आणि बाद झाला. ऋषभ पंतची ही चूक पाहून सुनील गावस्कर यांनी त्याचे वाभाडे काढले.

समालोचन करताना सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, ‘मूर्ख.. मूर्ख..मूर्ख.. तुमच्याकडे दोन फिल्डर आहे आणि तुम्ही आताही असाच शॉट खेळायला जाता. मागचा शॉट चुकला होता आणि बघा तुमचा झेल कुठे पकडला गेला. ही विकेट दिली. तुम्ही असं बोलू शकत नाही की हा तुमचा नैसर्गिक खेळ आहे. मला माफ करा. हा नैसर्गिक खेळ नाही. हा एक मूर्खपणा आहे. तुमच्या संघाला आणखी कमकुवत करत आहे. तुम्हाला स्थिती समजणं गरजेचं आहे.’

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.