SRH vs RR Highlight Score, IPL 2025 : राजस्थान रॉयल्सचा पहिल्याच सामन्यात दारूण पराभव, हैदराबाद 44 धावांनी विजयी
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Score in Marathi : आयपीएल स्पर्धेतील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना हैदराबादने 44 धावांनी जिंकला. राजस्थानसमोर विजयासाठी 286 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण राजस्थानला 20 षटकात फक्त 242 धावांवर मजल मारता आली.

आयपीएल 2025 च्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्सने प्रथम फलंदाजी केली आणि गेल्या हंगामाप्रमाणे आपल्या स्फोटक फलंदाजीचं दर्शन घडवलं. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने इशान किशनच्या शानदार शतकाच्या जोरावर 286 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. राजस्थाननेही जोरदार प्रत्युत्तर दिले पण संघाला फक्त 242 धावाच करता आल्या. राजस्थानकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक ७० धावा केल्या.
LIVE NEWS & UPDATES
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : राजस्थान रॉयल्सचा पहिल्याच सामन्यात दारूण पराभव, हैदराबाद 44 धावांनी विजयी
सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात असलेल्या खेळाडूंप्रमाणे पहिल्या सामन्यात खेळी केली. राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 286 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण आव्हान काही गाठता आलं नाही. हैदराबादने राजस्थानचा 44 धावांनी पराभव केला.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : ध्रुव जुरेल 70 धावा करून बाद
ध्रुव जुरेल 35 चेंडूत 70 धावा केल्या आणि बाद झाला. एडम झाम्पाने त्याला बाद केलं.
-
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : राजस्थान रॉयल्सला चौथा धक्का
संजू सॅमसनच्या रुपाने राजस्थान रॉयल्सला चौथा धक्का बसला आहे. 37 चेंडूत 66 धावा करून बाद झाला.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : ध्रुव जुरेलची अर्धशतकी खेळी
संजू सॅमसननंतर ध्रुव जुरेलने अर्धशतकी खळी केली. विजयाचं गणित कठीण असलं तर धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : संजू सॅमसनने 26 चेंडूत ठोकलं अर्धशतक
संजू सॅमसमने 26 चेंडूत 50 धावा केल्या. यावेळी त्याने 6 चौकार आणि तीन षटकार मारले.
-
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : सॅमसन आणि जुरेलची जोडी जमली, चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
राजस्थान रॉयल्सला सुरुवातीला तीन धक्के बसल्यानंतर सॅमसन आणि जुरेलची जोडी जमली आहे. या जोडीने 24 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : नितिश राणा फक्त 11 धावा करून बाद
नितिश राणाच्या रुपाने राजस्थान रॉयल्सला तिसरा धक्का बसला. फक्त 11 धावांवर त्याचा डाव आटोपला.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : रियान परागचा कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात नशिब फुटकं
रियान परागचा डाव अवघ्या दोन चेंडूत संपुष्टात आला आहे. पहिल्या चेडूंवर चौकार मारल्यानंतर काही बेस्ट करेल असं वाटत होतं. पण दुसऱ्या चेंडूवर विकेट देऊन बसला.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद
यशस्वी जयस्वाल फक्त 1 धाव करून तंबूत परतला आहे. सनराझर्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना राजस्थानला पहिला धक्का बसला आहे.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : सनरायझर्सकडून राजस्थानला 287 धावांचं आव्हान, हैदराबादचं पारडं जड
सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 286 धावा केल्या आणि विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान कठीण असून गाठणं वाटतं तितकं सोपं नाही.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : इशान किशनची शतकी खेळी
इशान किशनने 45 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 100 धावा केल्या. यासह स्पर्धेतील पहिलं शतक ठोकलं.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : नितीश कुमारच्या रुपाने तिसरा धक्का
नितीश कुमारच्या रेड्डीच्या रुपाने तिसरा धक्का बसला आहे. 15 चेंडूत 30 धावा करून बाद झाला आहे.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : इशान किशनची आक्रमक खेळी, 25 चेंडूत ठोकलं अर्धशतक
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या इशान किशनने आक्रमक खेळी केली. त्याने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : सनरायझयर्स हैदराबादची धावसंख्या 150 पार
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 12 षटकांचा खेळ संपला तेव्हा 150 पार धावा झाल्या होत्या.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : ट्रेव्हिस हेड 67 धावांची खेळी करून बाद
ट्रेव्हिस हेडच्या रुपाने सनरायझर्स हैदराबादला दुसरा धक्का बसला आहे. त्याने 31 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीे 67 धावा केल्या. तुषार देशपांडेे त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : ट्रेव्हिस हेडने 21 चेंडूत ठोकलं आक्रमक अर्धशतक
ट्रेव्हिस हेडने आपल्या स्वभावानुसार पहिल्या सामन्यात आक्रमक खेळी केली. अवघ्या 21 चेंडूत 50 धावा पूर्ण केलं. यावेळी त्याने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची पिसं काढली.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : पॉवर प्लेमध्ये हैदराबादच्या 1 बाद 94 धावा
पॉवर प्लेमध्ये हैदराबादच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. सहा षटकात 1 गडी बाद 94 धावा केल्या.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : अभिषेक शर्माची आक्रमक खेळी संपुष्टात
सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का बसला आहे. अभिषेक शर्मा 24 धावा करून बाद झाला.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : अभिषेक शर्मा माघारी, हैदराबादला पहिला झटका
राजस्थानच्या महीश तीक्षणा याने हैदराबादला पहिला झटका दिला आहे. महीशने अभिषेक शर्मा याला 24 धावांवर आऊट केलं आहे.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : अभिषेक शर्मा- ट्रेव्हिस हेडची आक्रमक सुरूवात
अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडने आक्रमक सुरुवात केली आहे. तीन षटकात बिनबाद 45 धावा केल्या आहेत.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा-ट्रेव्हिस हेड जोडी मैदानात
सनरायझर्स हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली असून अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी मैदानात आहे.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : राजस्थान रॉयल्सची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने, रियाननेे निवडली गोलंदाजी
नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि रियान परागने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात आणखी एका आरोपीला अटक
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी आणखी एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजीव रंजन पांडे याला झारखंड वरून अटक केली आहे.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : राजस्थानची अशी असू शकते प्लेइंग 11
यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शुभम दुबे, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, फजलहक फारुकी.
इम्पॅक्ट प्लेयर: कुमार कार्तिकेय/तुषार देशपांडे.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : हैदराबादची अशी असू शकते प्लेइंग 11
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अभिनव मनोहर, सचिन बेबी/अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, अॅडम झांपा, मोहम्मद शमी, राहुल चहर/जयदेव उनाडकट
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ
राजस्थान रॉयल्स संघ: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शुभम दुबे, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, मदवीर सिंग, मदवीर सिंग, युधवीर कुमार, अकाश चराकी तीक्षाना, क्वेना मफाका, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी, कुणाल सिंग राठौर.
-
SRH vs RR Live Score, IPL 2025 : सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ
सनरायझर्स हैदराबाद संघ: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, सचिन बेबी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, ॲडम झम्पा, मोहम्मद शमी, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कमिंदू मेंडिस, झीशान अत्युदर, विशारद, झीशान मंजुषी, सिमरन एतसारी, मोहम्मद शमी. सिंग, एशान मलिंगा, अनिकेत वर्मा.
Published On - Mar 23,2025 2:13 PM





