मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेबाबत सुरेश रैनाने मौन सोडलं, म्हणाला…

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी सुरेश रैनावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेबाबत सुरेश रैनाने मौन सोडलं, म्हणाला...
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 8:29 PM

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Team India Suresh Raina) आणि सुझान खानची (Sussanne Khan) आज सकाळी अटकेनंतर सुटका करण्यात आली. या दोघांना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सहार पोलिसांनी ही कारवाई केली होती. मुंबईतील एअरपोर्टनजिक असलेल्या ड्रॅगन फ्लाय या पबमध्ये हाय प्रोफाईल पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. पबमध्ये पार्टीदरम्यान कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रैनासह अनेक लोकांना पोलिसांनी पकडले होते. (Suresh Raina arrest; says regrets and its unintentional incident in Mumbai)

रैनाविरोधात कलम 188 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री तीन वाजेपर्यंत चाललेल्या या पार्टीत गायक गुरु रंधावा (Guru Randhawa), बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझान खानसह (Sussanne Khan) बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, या अटकेबाबत सुरेश रैनाने मौन सोडलं आहे.

सुरेश रैना म्हणाला की, “ही एक अत्यंत दुर्दैवी आणि नकळत घडलेली घटना होती”. रैनाच्या वतीने, त्याच्या मॅनेजमेंट कंपनीने एक निवेदन जारी केले आहे की, त्यात म्हटलं आहे की, “रैनाला तिथल्या स्थानिक वेळेचे नियम आणि प्रोटोकॉलची माहिती नव्हती. निवेदनात असेही म्हटले आहे की, रैना एका शुटिंगसाठी मुंबईत आला होता. परंतु हे शुटिंग रात्री उशिरापर्यंत चाललं. त्यानंतर दिल्लीला जाण्यापूर्वी रैनाच्या एका मित्राने त्याला डिनरसाठी बोलावलं होतं. त्यामुळे तो संबंधित ठिकाणी डिनरसाठी गेला होता. परंतु त्याला स्थानिक नियम आणि प्रोटोकॉलबाबत जराही कल्पना नव्हती”.

मुंबईतील एअरपोर्टनजीक ड्रॅगन फ्लाय पबमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये अनेकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. या पार्टीत अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला पायदळी तुडवले. तसेच या पार्टीत उपस्थित असलेल्यांनी मास्कही लावला नव्हता. पोलिसांना सर्व प्रकाराची माहिती मिळताच रात्री साडेतीनच्या दरम्यान त्यांनी या पबवर छापा टाकला. या पब पार्टीत गायक गुरु रंधावा, सुझान खान (Sussanne Khan) आणि इतर सेलेब्रिटीही उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सुरेश रैनासह या पब मालकावरही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी रैनावर आयपीसीच्या कलम 188, 269 आणि 34 नुसार कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या : 

गुरु रंधावापासून लांब राहा, आम्हाला तुला IPL मध्ये पाहायचंय, जेलमध्ये नाही; चाहत्यांचा सुरेश रैनाला सल्ला

Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

Sussanne Khan | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात गुन्हा

(Suresh Raina arrest; says regrets and its unintentional incident in Mumbai)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.