नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियाला स्वस्तात गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडिया 100 धावांची पिछाडीवर होती. नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी नक्की काय काय घडलं, हे आपण जाणून घेणार आहोत.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव आणि केएस भरत या दोघांनी पदार्पण केलं. सूर्यकुमार टीम इंडियाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये वयाच्या तिशीनंतर पदार्पण करणारा खेळाडू ठरला.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला. रवींद्र जडेजा याने 5 महिन्यांनी कमबॅक केलं. जडेजाच्या कमबॅकमुळे टीम इंडियाला बू्स्टर मिळाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला धक्के द्यायची सुरुवात केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 177 धावांनी ऑलआऊट करुनच दम घेतला. जडेजाने टीम इंडियाकडून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या 5 महत्त्वाच्या खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
जडेजा व्यतिरिक्त रवी आश्विन याने 3 विकेट्स घेतल्या. अश्विन याने यासह कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. अश्विन यासह कमी डावात 450 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. अश्विनने अनिल कुंबळे याचा कमी डावात 450 बळींचा विक्रम अश्विनने ब्रेक केला.
ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडिया खेळायला आली. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल दोघे खेळायला आले. या दोघांन झोकात सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 76 धावा जोडल्या. या दरम्यान कॅप्टन रोहित शर्माने अर्धशतक ठोकलं दोघांना चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र केएल राहुल अपयशी ठरला.
केएल 202 धावा करुन आऊट झाला. यानंतर आर अश्विन मैदानात आला. मात्र अवघ्या काही चेंडूंनंतर पहिल्या दिवसाचं खेळ संपला. तेव्हा रोहित आणि आर अश्विन नाबाद होते. टीम इंडियाने 24 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 77 धावा केल्या. टीम इंडिया अजूनही 100 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.