IND vs SA 2nd t20 : सूर्यकुमार यादवची कमाल, 18 चेंडूत अर्धशतक
सूर्यकुमारनं केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. त्यानं केलेल्या कामगिरीविषयी वाचा...
नवी दिल्ली : सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागच्या काही दिवसांपासून चांगलाच फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमारनं आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) दुसऱ्या टी-20 (T20) सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. गुवाहाटीमधील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात सूर्यकुमारनं केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. यातच रोहित शर्मानं देखील रेकॉर्ड बनवला आहे.
सूर्यकुमारनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमारनं 24 धावा पूर्ण करताच हे स्थान गाठलं.
बीसीसीआयचं ट्विट
Milestone ? – @surya_14kumar becomes the fastest batter to get to 1000 T20I runs in terms of balls (573) faced.#TeamIndia pic.twitter.com/iaFgAX8awu
— BCCI (@BCCI) October 2, 2022
The SKY show is on in Guwahati! ⚡️ ⚡️
And here are some snippets of it ? #TeamIndia
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia | @surya_14kumar pic.twitter.com/vTSWeSJNkH
— BCCI (@BCCI) October 2, 2022
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात कमी चेंडूत 1000 धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उजव्या हाताच्या फलंदाजाने अनेक विक्रम केले.
दुसऱ्या सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलनंतर हा टप्पा गाठणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला. सूर्यकुमारने 573 चेंडूत 1000 धावा केल्या आहेत. जे सर्वात कमी चेंडूत 1000 धावा आहे.
तिसरं र्धशतक
सूर्यकुमारनं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरं जलद अर्धशतक ठोकलंय. सूर्यकुमारनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात केवळ 18 चेंडूत अर्धशतक केलंय.
भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा तो दुसरा आणि तिसरा क्रिकेटपटू ठरलाय. त्याच्या आधी युवराज सिंगनं 2007 च्या T20 विश्वचषकात डरबनमध्ये इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक केले होतं. केएल राहुलनं 2021 मध्ये दुबईत स्कॉटलंडविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक केलं होतं.
दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारनं 22 चेंडूत 5 चौकार आणि तब्बल षटकार मारले. 61 धावांची तुफानी खेळी खेळली. हे त्याचे टी-20 मधील नववे अर्धशतक आहे. त्यानं विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 42 चेंडूत 102 धावांची शतकी भागीदारी केली.