IND vs SL : सूर्यकुमार यादवला दुसऱ्या वनडेतही संधी नाही? हा खेळाडू ठरु शकतो कारणीभूत
सूर्याने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शतक ठोकलं.यानंतरही पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरमुळे संधी देण्यात आली नाही.

IND vs SL, 2nd ODI, Suryakumar Yadav : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (SL vs IND) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कोलकातात (Kolkata) गुरुवारी खेळवला जाईल. टीम इंडियाने (Indian Cricket Team) याआधी पहिल्या सामन्यात गुवाहाटीत शानदार विजय मिळवला होता. सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. सूर्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. आता दुसऱ्या वनडेतही सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. श्रेयसने याआधी एकदिवसीय सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. (ind vs sl 2nd odi team india suryakumar yadav may be will droped again do not placed in playing eleven due to shreyas iyer)
सूर्याने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत शानदार कामगिरी केली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सूर्याने शतक ठोकलं. सूर्याला यानंतरही पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरमुळे संधी देण्यात आली नाही. तर श्रेयसला पहिल्या सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. श्रेयसने 24 बॉलमध्ये 28 रन्स केल्या. मात्र आता सूर्याला पुन्हा श्रेयसमुळेच दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर बसावं लागू शकतं, असं म्हटलं जात आहे.
श्रेयसने बांगलादेश दौऱ्यात बांगलादेश विरुद्धच्या वनडे सामन्यात 82 धावांची खेळी केली होती. यानंतर चितगावमध्ये 86 धावांचं योगदान दिलं. तसेच मीरपूर कसोटी सामन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या डावातही 87 आणि नाबाद 29 धावा केल्या. श्रेयसने आतापर्यंत एकदिवसीय कारकीर्दीतील 40 सामन्यात 1 हजार 565 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.
त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्मा पुन्हा श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवत दुसरी संधी देणार, की सुर्याचं कमबॅक होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.
टीम श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा.