टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त! बांगलादेशविरुद्धच्या मालिकेला मुकणार?
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यापासून एकही सामना खेळलेली नाही. आता थेट बांगलादेशविरुद्ध कसोटी आणि टी20 मालिका खेळणार आहे. पण या मालिकेसाठी आता 15 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाला धक्का बसला आहे. काय झालं ते जाणून घ्या
टीम इंडियाचा सध्या कोणत्याही दौरा नसल्याने भारताचे दिग्गज खेळाडू देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देत आहे. सध्या बुची बाबू स्पर्धा सुरु आहे. त्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत बीसीसीआयच्या सांगण्याप्रमाणे दिग्गद खेळाडू खेळत आहेत. बुची बाबू स्पर्धा सुरू असून 5 सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार आहे. पण या दरम्यान टीम इंडियासाठी आणि चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन विरुद्ध मुंबईच्या शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळला होता. पण या सामन्यात त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. दुलीप ट्रॉफीपूर्वी असं झाल्याने टीम इंडियाला धक्का बसला आहे. कारण बांगलादेशविरुद्ध संघाची घोषणा करण्यासाठी दुलीप ट्रॉफीतील कामगिरी पाहिली जाणार आहे.
टीएनसीए इलेव्हन विरुद्ध मुंबई सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सुर्यकुमार यादवच्या उजव्या हाता क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. मैदानात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचार केले. पण वेदना होत असल्याने त्यला मैदान सोडावं लागलं .सूर्यकुमार यादवने कसोटी संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण संघात निवड होण्यासाठी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणं आवश्यक आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दुसरीकडे, या स्पर्धेतून रवींद्र जडेजा, उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांनी माघार घेतली आहे.
Wishing you a speedy recovery @surya_14kumar 🥺🤍 May God bless you with good health always 🧿#SuryaKumarYadav pic.twitter.com/nj86wKR6Wu
— sheenu. (@onlyskymatters) August 30, 2024
सूर्यकुमार यादव दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार होता. पण आता हाताच्या दुखापतीमुळे खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. सूर्यकुमार यादव टीम सीमध्ये आहे. पहिला सामना 5 सप्टेंबरला टीम डी सोबत होणार आहे. त्यानंतर 12 सप्टेंबरला बी आणि सी टीम आमनेसामने येतील. 19 सप्टेंबरला ए संघासोबत सामना होईल.
टीम सी : ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, रजत पाटीदार, उमरान मलिक, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, रितिक शौकीन, मानव सुथार, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर), संदीप वारियर.