सूर्यकुमार यादवचा आयपीएलमधला प्रवास असा राहिला, मुंबई इंडियन्सने 4 वर्षांनी दाखवला विश्वास

सूर्यकुमार यादव याच्या नावाने गोलंदाज थरथर कापतात. त्याच्या विचित्र फटकेबाजीने चेंडू कुठे टाकावा हेच गोलंदाज कधी कधी विसरून जातात. अशा सूर्यकुमार यादवचा पुन्हा एकदा बोलबाला आहे. सूर्यकुमार यादवचा आयपीएलमधला प्रवास कुठून सुरु झाला आणि कसा झाला ते समजून घेऊयात...

सूर्यकुमार यादवचा आयपीएलमधला प्रवास असा राहिला, मुंबई इंडियन्सने 4 वर्षांनी दाखवला विश्वास
SKY है तो मुमकीन है! सूर्यकुमार यादवला कोलकाता नाइट रायडर्सकडून मिळाली चमक, कसं ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 4:02 PM

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या स्फोटक खेळीमुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधला अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. जगभरातील व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणना केली जाते. सूर्यकुमार यादव 32 वर्षांचा असून आयपीएलमध्ये एक अनुभवी खेळाडू म्हणून गणला जातो. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून सूर्याने आपली चमक दाखवली आहे. या दोन्ही संघाकडून खेळताना तीन वेळा जेतेपदाचा साक्षीदार राहिला आहे. 2012 मध्ये सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. 2012 च्या पर्वात फक्त एक सामना वाटेला आला आणि शून्यावर बाद होत तंबूत परतला. त्यानंतर मुंबईने त्याला रिलीज केलं आणि कोलकाता नाइट रायडर्समधून खेळताना दिसला. 2014 मध्ये त्याने आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांचं कंबरडं मोडलं. चौकार षटकारांची आतषबाजी करत फिनिशर म्हणून नावलौकीक मिळवला. कोलकात्याला जेतेपद मिळालं त्याचा तो साक्षीदार होता. 2018 च्या पर्वाआधी मुंबई इंडियन्सला उपरती झाली आणि त्यांनी त्याला परत संघात घेतलं.

2019 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळताना जेतेपदात त्याचा वाटा राहिला. त्यानंतर 2020 सालीही त्याची बॅट चांगलीच तळपली. सूर्यकुमार यादवने 2018 मध्ये मुंबई इंडियन्साठी 512, 2019 मध्ये 424 आणि 2020 मध्ये 480 धावा केल्या. 2022 मध्ये दुखापतीमुळे हवी तशी छाप सोडता आली नाही. 8 सामन्यात 303 धावा केल्या. 2023 मध्ये मात्र त्याने 16 सामन्यात 605 धाव केल्या. यात 1 शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता.

  • आयपीएल 2012 : 1 सामना आणि 0 धावा (मुंबई इंडियन्स)
  • आयपीएल 2013 : संधी मिळाली नाही
  • आयपीएल 2014 : 16 सामने 164 धावा (कोलकाता नाइट रायडर्स)
  • आयपीएल 2015 : 13 सामने आणि 157 धावा (कोलकाता नाइट रायडर्स)
  • आयपीएल 2016 : 15 सामने आणि 182 धावा (कोलकाता नाइट रायडर्स)
  • आयपीएल 2017 : 10 सामने आणि 105 धावा(कोलकाता नाइट रायडर्स)
  • आयपीएल 2018 : 14 सामने आणि 512 धावा (मुंबई इंडियन्स)
  • आयपीएल 2019 : 16 सामने आणि 424 धावा (मुंबई इंडियन्स)
  • आयपीएल 2020 : 16 सामने आणि 480 धावा (मुंबई इंडियन्स)
  • आयपीएल 2021 : 14 सामने आणि 317 धावा (मुंबई इंडियन्स)
  • आयपीएल 2022 : 8 सामने आणि 303 धावा (मुंबई इंडियन्स)
  • आयपीएल 2023 : 16 सामने आणि 605 धावा (मुंबई इंडियन्स)

सूर्यकुमार यादव यंदाही दुखापतग्रस्त आहे. नुकतंच त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. एनसीएमध्ये आता रिकव्हर होत आहे. मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.