Video : सूर्यकुमार यादवला आठवला टी20 वर्ल्डकप फायनलचा प्रसंग, मग ठरवलं असं की…

| Updated on: Jul 31, 2024 | 6:09 PM

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लिन स्विप दिला. तीन सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली. तिसऱा सामना अतितटीचा झाला. पण सूर्यकुमारच्या निर्णयामुळे विजयाचा घास खेचून आणण्यात यश आलं. तेव्हा सूर्यकुमार यादवच्या डोक्यात काय सुरु होतं हे त्यानेच सांगितलं.

Video : सूर्यकुमार यादवला आठवला टी20 वर्ल्डकप फायनलचा प्रसंग, मग ठरवलं असं की...
Image Credit source: BCCI
Follow us on

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने चांगली कामगिरी केली. श्रीलंकेला 3-0 ने पराभूत करत नव्या गंभीर-सूर्यकुमारच्या नव्या कारकिर्दिची सुरुवात केली आहे. दरम्यान, तिसरा टी20 सामना पूर्णपणे श्रीलंकेच्या पारड्यात झुकलेला होता. एका क्षणी वाटत होतं की हा सामना श्रीलंका आरामात जिंकेल. पण जादूची छडी फिरवावी तसा सामन्याचं रुपडं पालटलं. भारताने हा सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. तसेच सुपर ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर सामना जिंकला. पण जेव्हा हा सामना श्रीलंकेच्या पारड्यात झुकलेला होता, तेव्हा सूर्यकुमार यादवच्या मनात काहीतरी वेगळंच सुरु होतं. इतकंच काय तर 19वं आणि 20वं षटक खूपच निर्णायक ठरलं. रिंकु सिंहला 19वं षटक आणि 20वं षटक खुद्द सूर्यकुमार यादवने टाकलं. या दोन षटकात कमाल झाली. दोघांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला. सूर्यकुमार यादवने सांगितलं की, “अशा प्रकारचे खेळ मी आधीही खूप वेळा खेळलो आहे. दुसऱ्या कर्णधारांच्या मार्गदर्शनाखाली..शेवटच्या चेंडूपर्यंत कसा सामना न्यायचा ते..रिंकु, रियान आणि इतरांना मी आधीच सांगून ठेवलं होतं की, नेटमध्ये गोलंदाजी करत राहा. विकेट ड्राय आहेत इथे, गरज पडली तर गोलंदाजी करावी लागेल.”

सूर्यकुमार यादवला यावेळी टी20 वर्ल्डकपमधील प्रसंग आठवला. “30 बॉल 30 रन्स असं समीकरण सुरु होतं. तेव्हा एक महिना पाठी गेलो. ते खेळपट्टी तर खूपच सोपी होती. या खेळपट्टीवर बॉल टर्न होत होता. मग मी विचार केला की एक विकेट मिळाली किंवा एक दोन ओव्हर चांगल्या टाकल्या. थोडा प्रेशर तयार केलं तर खेळ त्यांच्यापासून थोडा लांब जाईल. मग माझ्या डोक्यात वेगळाच विचार आला मी निर्णय घेतला. तसे निर्णय घेणं मला आवडतं. “, असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.

‘मी मुंबईत इतकं सारं लोकल क्रिकेट खेळलो आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळलो आहे. या सर्व ठिकाणी खेळून खेळून तुम्ही बरंच काही शिकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यावर तुम्हाला कुठे धावा द्यायच्या आणि कसं कुठे कोणाला थांबवायचं आहे. हे सर्वकाही तळागाळात शिकायला मिळतं.’, असंही सूर्यकुमार यादवने पुढे सांगितलं.