Suryakumar Yadav Injury: सूर्यकुमार संघाबाहेर, कर्णधार रोहित शर्माचा ‘फायदा’, जाणून घ्या कारण

सूर्यकुमार सध्या संघासह लखनौमध्ये आहे. मंगळवारी संघाच्या सराव सत्राचाही तो भाग होता. मात्र, क्रिकबझच्या वृत्तानुसार या स्फोटक फलंदाजाला टी-20 मालिकेसाठी अनफिट घोषित करण्यात आले आहे. मात्र, त्याला ही दुखापत कधी आणि कशी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Suryakumar Yadav Injury: सूर्यकुमार संघाबाहेर, कर्णधार रोहित शर्माचा 'फायदा', जाणून घ्या कारण
Suryakumar Yadav (Image Credit : BCCI TWITTER)
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 1:30 PM

लखनौ : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी भारतीय संघाला झटका (Indian Cricket Team) बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka Cricket Team) टी 20 मालिकेत खेळू शकणार नाही, अशी बातमी मंगळवारी संध्याकाळी मिळाली होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळताना दीपक चाहरला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे षटक सुरु असतानाच दीपकला मैदान सोडावं लागलं होतं. दीपक चाहर आगामी सीरीजमध्ये खेळू शकणार नाही. त्यातच आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. विस्फोटक फलंदाज आणि नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिका विजयाचा हिरो सूर्यकुमार यादवदेखील (Suryakumar Yadav) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत सहभागी होणार नाही.

सूर्यकुमार सध्या संघासह लखनौमध्ये आहे. मंगळवारी संघाच्या सराव सत्राचाही तो भाग होता. मात्र, क्रिकबझच्या वृत्तानुसार या स्फोटक फलंदाजाला टी-20 मालिकेसाठी अनफिट घोषित करण्यात आले आहे. मात्र, त्याला ही दुखापत कधी आणि कशी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांमध्ये खेळला आणि त्यात त्याने 107 धावा केल्या. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. अशा स्थितीत त्याची संघात अनुपस्थिती भारतासाठी कठीण होऊ शकते.

सूर्यकुमार संघात नसल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र या गोष्टीचा एक प्रकारे टीम इंडिया आणि कर्णधार रोहितला फायदादेखील होणार आहे. सूर्यकुमार बाद झाल्याने आता टीम इंडिया त्याच्या जागी इतर खेळाडूंना संधी देऊ शकते. इतर खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर आणि पाचव्या क्रमांकावर प्रयत्न करता येतील. T20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, भारताकडे मधल्या फळीतील अनेक फलंदाज आहेत. ज्यामध्ये दीपक हुडा, श्रेयस अय्यर यांची नावं सर्वात पुढे आहेत. बेंचवर बसून असलेल्या खेळाडूंना सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत संघात संधी देता येईल. संघ व्यवस्थापन आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत एक मजबूत संघ तयार करायचा आहे. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये सातत्याने प्रयोग केले जात आहे. सूर्याच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत प्रयोग करता येतील. तसेच एक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू उपलब्ध नसताना इतर खेळाडूंचा कस लागणार आहे.

सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंची चाचणी

सूर्यकुमार यादवच्या उपस्थितीमुळे श्रेयस अय्यरला टी-20 प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण जात होते. आता टीम इंडिया श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर आजमावू शकते. हा तोच नंबर आहे जिथे श्रेयस अय्यर पूर्वी खेळायचा. पण श्रेयसच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवने त्याची जागा घेतली. श्रेयस अय्यरशिवाय मधल्या फळीत दीपक हुडालाही संधी दिली जाऊ शकते. दीपक हुडाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली पण टी-20 फॉरमॅटमध्ये तो अधिक धोकादायक खेळाडू आहे. तो गोलंदाजीही करू शकतो, त्यामुळे टीम इंडिया त्याला आजमावू शकते.

इतर बातम्या

IND vs SL : ‘हिटमॅन’ शर्माकडे तीन विश्वविक्रमांची संधी, विराट, धवन, गप्टिलला मागे टाकणार?

ना रोहित, ना युवराज, IND vs SL T20 मधला सिक्सर किंग कोण? पाहा हिटिंग मास्टर्सची लिस्ट

IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.