Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोनी, विराट आणि रोहितचं एका शब्दात वर्णन, सुर्यकुमार यादवची धमाकेदार उत्तरं!

एका फॅन्सने सूर्यकुमार यादवला सचिन तेंडुलकरचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं. यावेळी सूर्यकुमार यादवने 'क्रिकेटचा देव' असं म्हणत सचिनच्या कारकीर्दीला शोभेल असं उत्तर दिलं. (Suryaumar yadav on MS Dhoni Virat kohli Rohit Sharma)

धोनी, विराट आणि रोहितचं एका शब्दात वर्णन, सुर्यकुमार यादवची धमाकेदार उत्तरं!
सुर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली, एम एस धोनी
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 12:47 PM

मुंबई :  सुर्यकुमार यादव (Suryakumar yadav)…. भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज… विराट कोहली (Virat kohli), महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या बरोबर खेळलेला फलंदाज…. अल्पावधीत त्याने आपल्या बॅटिंगची जादू जगभरातील क्रिकेट रसिकांना दाखवलीय. हळूहळू आपलं स्थान तो भारतीय क्रिकेट संघात बळकट करतो आगे. आयपीएलमधेयही तो खोर्‍याने धावा करतो. सध्या आयपीएल स्थगित झाल्याने खेळाडूंजवळ रिकामा वेळ आहे. ते सोशल मीडियावर आपला वेळ व्यतित करतायत. एका लाईव्ह सेशनदरम्यान सूर्यकुमार यादवला चाहत्यांनी अडचणीचे प्रश्न विचारले. पण सूर्यकुमार डगमगला नाही. केवळ एका शब्दात त्याला क्रिकेटपटूंची वर्णन करायचं होती. त्याने हे अवघड काम करुन दाखवलं. (Suryaumar yadav on MS Dhoni Virat kohli Rohit Sharma)

सोशल मीडियावर अनेकवेळा क्रिकेट जगतात सगळ्यात महान क्रिकेटर कोणता, अशा चर्चा झडतात. यामध्ये मग सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांची नावे आपसुकच येतात. साहजिकच क्रिकेट चाहत्यांना असे प्रश्न सारखे सारखे पडत असतात. अशाच प्रश्नांची उत्तरं सूर्यकुमार यादवने चाहत्यांना दिली.

सचिन, धोनी, विराट, रोहितबद्दल सूर्यकुमार काय म्हणाला?

एका फॅन्सने सूर्यकुमार यादवला सचिन तेंडुलकरचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं. यावेळी सूर्यकुमार यादवने ‘क्रिकेटचा देव’ असं म्हणत सचिनच्या कारकीर्दीला शोभेल असं उत्तर दिलं. एका फॅन्सने विराट कोहलीबद्दल एका शब्दात विचारलं तर सूर्यकुमार यादव म्हणाला ‘प्रेरणादायक…’ धोनीबद्दल जेव्हा त्याला विचारलं गेलं तेव्हा त्याच्यासमोर एक शब्द आला तो होता लिजेंड्री…

यानंतर भारताचा तसंच मुंबई इंडियन्सचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा याच्याबद्दलही सूर्यकुमार यादवला विचारलं गेलं. सुर्यकुमार आणि रोहित शर्मा मुंबईकडून एकत्र खेळतात. सहाजिकच चहात्यांना उत्सुकता होती की रोहितबद्दल सूर्यकुमार यादव काय बोलतोय तर सुर्यकुमारने उत्तर दिलं ‘हिटमॅन’

सूर्यकुमारची आयपीएमधील कामगिरी

सुर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये 108 मॅचमध्ये 2197 धावा ठोकल्या आहेत. आयपीएलच्या 14 व्या पर्वामध्ये सूर्यकुमार यादवने सात मॅचमध्ये 173 रन केले आहेत. कोरोना व्हायरसच्या मैदानातील एन्ट्रीमुळे आयपीएलचं 14 पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे.

(Suryaumar yadav on MS Dhoni Virat kohli Rohit Sharma)

हे ही वाचा :

Sushil Kumar | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर अटक, 18 दिवसांचा शोध संपला

जेव्हा धनश्री आणि युजवेंद्रमध्ये विराट कोहली आला, काय आहे फोटोमागची कहाणी?

वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत 100 शतकं, सगळ्या फॉरमॅटमध्ये 63 हजार रन्स, कुटुंब करत होतं तंबाखूची शेती, तो फलंदाज कोण?

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.