Video : ॲक्शनच नाही तर झहीरच्या अंदाजात सुशीला मीणाचा यॉर्कर, क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोर क्लीन बोल्ड

सुशीला मीणा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तिची बॉलिंगची शैली पाहून क्रिकेटपटूही प्रेमात पडले आहेत. सुशीला मीणाची बॉलिंग ॲक्शन अगदी झहीर खानसारखी आहे. नुसती ॲक्शनच नाही तर तिच्या गोलंदाजीला धार देखील आहे. तिने याचा डेमो क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोर यांना दिला.

Video : ॲक्शनच नाही तर झहीरच्या अंदाजात सुशीला मीणाचा यॉर्कर, क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोर क्लीन बोल्ड
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 2:59 PM

सुशीला मीणा हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. राजस्थानच्या प्रतापगडची सुशीला मीणा हीचं स्वप्न एक क्रिकेटपटू होण्याचं आहे. यासाठी ती सराव करत आहे. तिच्या या मेहनतीची आणि ॲक्शनची दखल खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी घेतली होती. तसेच सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ शेअर करून स्तुती केली होती. त्यानंतर राजस्थान क्रिकेट असोसिएशनने तिला ट्रेनिंग देण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे झहीर खानच्य़ा शैलीत गोलंदाजी करताना तिला आता राहणं, खाणं आणि क्रिकेटच्या सरावात कोणतीच अडचण येणार नाही. असं असताना सुशीला मीणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राजस्थानचे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोरला तिने क्लीन बोल्ड केल्याचं दिसत आहे. सुशीला कुमार फक्त ॲक्शनच नाही तर तिच्या गोलंदाजीला धार असल्याचंदेखील दिसत आहे.

सुशीला मीणाने राज्यवर्धन राठोर यांनी राउंड दी विकेट चेंडू टाकला. हा चेंडू खेळताना राज्यवर्धन राठोर चुकले आणि क्लीन बोल्ड झाले. सुशीलाने परफेक्ट यॉर्कर टाकला. हा चेंडू काही त्यांना कळलाच नाही आणि स्टंप घेऊन गेला. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटमधील सुशीला मीणा हा एक तारा ठरू शकते. आता सुशीला तिच्या भविष्याच्या दृष्टीने कशी मेहनत घेते यावर सर्वस्वी अवलंबून आहे. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं होतं की, ‘साधं, सहज आणि पाहण्यासाठी एकमद मस्त.. सुशीला मीणा तुझ्या बॉलिंगची झलक दिसते, झहीर खान.. तुलाही असंच वाटते का?’

सचिनच्या या पोस्टवर झहीर खानने प्रत्युत्तर देत सांगितलं की, ‘तुम्ही बरोबर सांगत आहात. मी याबाबत पूर्णपणे सहमत आहे. तिची अॅक्शन प्रभावशली आहे. ती पहिल्यापासून आशावादी वाटत आहे.’ सुशीला मीणा आणि झहीर खान यांच्या शैलीत साम्यता आहे. चेंडू टाकण्यापूर्वी दोघंही मोठी उडी घेतात हे खास आहे. सुशीला मीणा सध्या पाचवीत शिकत आहे. तसेच अभ्यासासोबत आता क्रिकेटचे धडे गिरवत आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.