टी20 क्रिकेट स्पर्धेत अय्यरच्या नेतृत्वात मुंबईचा शेवटच्या षटकात विजय, बाद फेरीत मिळवलं स्थान
सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत मुंबईने आंध्र प्रदेशवर शेवटच्या षटकात विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. मुंबईने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणेने 49 चेंडूत 90 धावांची खेळी केली.
सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत मुंबई आणि आंध्र प्रदेश आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशने प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर संधीचं सोनं केलं. 20 षटकात 4 गडी गमवून 229 धावा केल्या आणि विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं. या त्यामुळे मुंबईची या धावा गाठताना सुरुवातीला दमछाक झाली. पृथ्वी शॉ 15 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव काही खास करू शकले नाहीत. सूर्यकुमार यादव फक्त 1 धाव करून बाद झाला. तर श्रेयस अय्यरने 11 चेंडूत 25 धावा केल्या. असं असताना अजिंक्य रहाणेचा झंझावात या सामन्यात पाहायला मिळाला. संयमी फलंदाज म्हणून छबी असलेला अजिंक्य रहाणे आक्रमक अंदाज दाखवला. तसेच आंध्र प्रदेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अजिंक्य रहाणेने 54 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 95 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 175.93 होता.
मुंबईला शेवटच्या षटकात विजयासाठी 6 धावांची गरज होती. शार्दुल ठाकुर स्ट्राईकला होता. तेव्हा त्याने एक धाव घेतली आणि सूर्यांश शेडगेला स्ट्राईक दिली. त्याने पुढच्या दोन चेंडूंवर शेडगेने चौकार मारले आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने बाद फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. मुंबईला शेवटच्या षटकात विजय मिळवून देणारा सूर्यांश आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सकडून खेळणार आहे. त्यामुळे त्याच्या या खेळीचं कौतुक होत आहे.
SURYANSH SHEDGE – REMEMBER THE NAME 🫡
The finisher is loading, he was picked by Punjab Kings in the auction.pic.twitter.com/S0SjaBQJVd
— Johns. (@CricCrazyJohns) December 5, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
आंध्र प्रदेश (प्लेइंग इलेव्हन): श्रीकर भारत (विकेटकीपर), अश्विन हेब्बर, शेख रशीद, पायला अविनाश, रिकी भुई (कर्णदार), बोधला कुमार, एसडीएनव्ही प्रसाद, केव्ही शशिकांत, कोडावंडला सुधरसन, सत्यनारायण राजू, चेपुरापल्ली स्टीफन.
मुंबई (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी