IND vs AFG : ‘बुमराहला बॉलिंग देताना..’; अफगाणिस्तानवर विजय मिळवल्यावर रोहितने खरं ते सांगितलं

IND vs AGF : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने अफगाणिस्तानवर विजय मिळवल्यावर जसप्रीत बुमराहबाबत मोठं विधान केलं आहे. बुमराह कोणत्याही मैदानावर कशा प्रकारे योजना आखतो त्याची भूमिका कशी असते हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे.

IND vs AFG : 'बुमराहला बॉलिंग देताना..'; अफगाणिस्तानवर विजय मिळवल्यावर रोहितने खरं ते सांगितलं
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 4:28 PM

टी-20 वर्ल्ड कप सुपर8 मधील सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तान संघावर विजय मिळवला. टीम इंडियाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी महत्त्वाची भागीदारी केली. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जीवावर टीम इंडियाने हा सामना जिंकला. सुपर-8 मध्येही बुमराहने इतर संघांना आपल्या कामगिरीने धडकी भरवली. मागील प्रत्येक सामन्यामध्ये बुमराहने आपली छापली सोडली आहे. टीम इंडियाने 47 धावांनी मिळवलेला विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा याने वेगवान गोलंदाज बुमराहचं कौतुक केलं आहे.

रोहित बुमराहबाबत काय म्हणाला?

बुमराह आमच्यासाठी काय करू शकतो हे आम्हाला सर्वांना माहित आहे. त्याचा योग्य वेळी वापर करणं महत्त्वाचं आहे. जबाबदारी घेण्यासाठी तो कायम तयार असतो. सामना कुठेही असूदेत तरी तो त्याचं काम पार पाडतो. टीममध्ये बदल करण्याबाबत बोलायचं झालं तर जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे टीम निवडावी लागते आजच्या सामन्यात तीन स्पिनर खेळवणं महत्त्वाचं वाटलं म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला. जर येत्या सामन्यांमध्ये गरत भासली तर परत तीन गोलंदाजांसह खेळवण्याचा निर्णय घेण्यासाठी तयार असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

दोन वर्षांआधी आम्ही या ठिकाणी खेळलो होते त्यामुळे आम्हाला इथल्या परिस्थितीचा अंदाज होता. त्यानुसार आम्ही सर्व स्ट्रॅटेजी केली होती. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांची निर्णायक भागीदारी निर्णायक ठरली. त्यानंतर गोलंदाजांनी धावसंख्येचा बचाव केल्याचंही रोहित शर्माने म्हटलं आहे.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 181-8 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने केलेली 53 धावांची अर्धशतकी खेळी आणि हार्दिक पंड्याची 32 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्यानंतर अफगाणिस्तानला संघाला 134 धावा करता आल्या. भारताकडून अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह यांनी तीन विकेट घेतल्या.

रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.