USA vs IND: कॅप्टन रोहित या दोघांना दाखवणार बाहेरचा रस्ता! कुणाला मिळणार संधी?
India Playing 11 Against Usa: टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2024 मोहिमेतील तिसरा सामना खेळणार यूएसए विरुद्ध खेळणार आहे.
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत जोरदार सुरुवात केली. टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात आयर्लंडवर मात करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध जवळपास गमावलेला सामना जिंकला. टीम इंडियाने अशाप्रकारे सलग 2 विजयांसह सुपर 8चा दावा मजबूत केला. टीम इंडियाचे गोलंदाज हे खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार ठरले. गोलदांजांच्या तुलनेत फलंदाजांना फारशी कामगिरी करता आली नाही. त्यातही 2 मुंबईकर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. त्यामुळे कॅप्टन रोहित यूएसए विरुद्धधच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करु शकतो.
रोहित आपल्याच मुंबईच्या 2 खेळाडूंना यूएसए विरुद्धच्या सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो, त्याचं कारण त्यांची कामगिरी. सूर्यकुमार यादव आणि ऑलराउंडर शिवम दुबे या दोघांनी दोन्ही सामन्यात घोर निराशा केली. शिवम दुबे पहिल्या सामन्यात 0 वर नॉट आऊट परतला. तर दुबेने दुसऱ्या सामन्यात 9 बॉलमध्ये फक्त 3 धावा केल्या. तसेच शिवमने निर्णायक सामन्यात कॅचही सोडला.
तर दुसऱ्या बाजूला सूर्याने आयर्लंड विरुद्ध 2 आणि पाकिस्तान विरुद्ध 7 अशा धावा केल्या. शिवमची आयसीसी स्पर्धेत खेळण्याची ही पहिली वेळ होती. मात्र सूर्यकुमार अनुभवी फलंदाज आहे. सूर्याला तुलनेत दुबळ्या आयर्लंड विरुद्धही धावा करता आल्या नाहीत. अशात आता रोहित सूर्यकुमार आणि शिवम या दोघांना बाहेर बसवू शकतो. तर त्या दोघांच्या जागी यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन या दोघांना संधी देऊ शकतो.
युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.