India A : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, या संघाचं आव्हान
India A vs UAE A : टीम इंडिया एने पाकिस्तानला पराभूत करत आशिया कप स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात यूएई विरुद्ध भिडणार आहे.
सध्या एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी आहेत. तिलक वर्मा याच्याकडे टीम इंडिया ए संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने शनिवारी 19 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर रंगतदार झालेल्या सामन्यात 7 धावांनी मात केली. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या 182 धावांचा यशस्वी बचाव केला आणि पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 बाद 176 धावांवर रोखलं. त्यानंतर आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
सलग दुसरा सामना कोण जिंकणार?
टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात यूएईचं आव्हान असणार आहे. बासिल हमीद यूएईचं नेतृत्व करणार आहे. तर तिलक वर्माकडे भारतीय संघाची धुरा आहे. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघ अजिंक्य आहेत. यूएईने त्यांच्या सलामीच्या सामन्यात ओमानवर 4 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडिया सलग दुसरा विजय मिळवणार की यूएई उलटफेर करणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध यूएई यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच ही मॅच मोबाईलवर हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
संयुक्त अरब अमिराती टीम ए : बासिल हमीद (कर्णधार), तनिश सुरी, मयंक राजेश कुमार, विष्णू सुकुमारन, राहुल चोप्रा, सय्यद हैदर शाह (विकेटकीपर), निलंश केसवानी, संचित शर्मा, मुहम्मद फारूख, मुहम्मद जवादुल्ला, ओमिद रहमान, अंश टंडन, ध्रुव पाराशर, आर्यन शर्मा आणि अकिफ राजा.
एमर्जिंग आशिया कप 2024 साठी टीम इंडिया ए : तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह, आयुष बदोनी, निशांत सिंधु, रमनदीप सिंह, अनुज रावत, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, रितिक शौकीन, वैभव अरोरा, रसिख सलाम, साई किशोर, राहुल चाहर आणि आकिब खान.