न्यूझीलंडने श्रीलंकेच्या तोंडातून खेचून आणला विजयाचा घास, मालिकेत 1-1 ने बरोबरी

न्यूझीलंडने अखेर टी20 मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेसमोर फक्त 108 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान सहज श्रीलंका गाठेल असं वाटत होतं. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि श्रीलंकन फलंदाजांना रोखलं.

न्यूझीलंडने श्रीलंकेच्या तोंडातून खेचून आणला विजयाचा घास, मालिकेत 1-1 ने बरोबरी
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 11:20 PM

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी20 सामना अतितटीचा झाला. कधी सामना या पारड्यात तर कधी त्या पारड्यात जात होता. त्यामुळे क्रीडारसिकांची धाकधूक वाढली होती. पण न्यूझीलंडने श्रीलंकेचा 5 धावांनी पराभव केला. श्रीलंकेला सर्व गडी बाद फक्त 103 धावाच करता आल्या. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 19.3 षटकात सर्व गडी बाद 108 धावा केल्या आणि विजयासाठी 109 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंका सहज गाठेल असं वाटलं होतं. कारण 19 व्या षटकापर्यंत श्रीलंकेच्या 7 गडी बाद 101 धावा झाल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर थीक्षाणाने 1 धाव घेतली आणि वेल सेट असलेल्या पाथुम निसंकाला स्ट्राईक दिली. त्यामुळे आता सामना सहज निघेल असं वाटत होतं. पण दुसऱ्या चेंडूवर नको तेच झालं. फिलिप्सने निसंकाला बाद करत तंबूत धाडलं. त्यामुळे आव्हान 4 चेंडूत 7 अशा स्थितीवर आलं. तिसऱ्या चेंडूवर पथिराना आला. त्याला आला तसाच तंबूत धाडला. त्यामुळे 102 धावांवर 9 गडी बाद अशी स्थिती आली.

तीन चेंडूत 7 धावांची आवश्यकता असताना नुवान तुषाराने एक धाव घेतली आणि 2 चेंडूत 6 धावा अशी स्थिती आणली. मग काय थीक्षणाने षटकाराच्या प्रयत्न केला पण चूक झाली. फिलिफ्सच्या गोलंदाजीवर मिच हेने झेल पकडला आणि न्यूझीलंडने हा सामना 5 धावांनी जिंकला. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. खरं तर विजयाचा घास हा श्रीलंकेच्या तोंडात होता. पण न्यूझीलंडने तो खेचून आणला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम रॉबिन्सन, विल यंग, ​​मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), जोश क्लार्कसन, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, झकरी फौल्केस, लॉकी फर्ग्युसन.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान तुषारा

Non Stop LIVE Update
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'.
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल.
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले...
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले....
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....