T20 WC: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर काय झालं होतं? आर. अश्विननं स्पष्टच सांगितलं..
भारत आणि पाकिस्तान टी20 वर्ल्डकप 2022 ला आमनेसामने आले होते. भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. स्ट्राईकला असलेल्या आर. अश्विनच्या मनात तेव्हा नेमकं काय सुरु होतं वाचा..
मुंबई : भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आयसीसी स्पर्धेतच एकमेकांसमोर उभे ठाकतात. शेवटचे हे दोन्ही संघ टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये आमनेसामने आले होते. साखळी फेरीतील या सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. विराट कोहलीच्या आयुष्यातील सर्वोत्तम सामन्यापैकी हा एक सामना होता. विराट कोहलीने हायव्होल्टेज सामन्यात जबरदस्त खेळी करत भारताला विजयपथावर आणलं होतं.विराट कोहली याने या सामन्यात 82 धावा केल्या. पण शेवटच्या चेंडूवर विजयी फटका मारत संघाला विजय मिळवून दिला होता. आता शेवटच्या चेंडू खेळताना नेमकं काय झालं होतं? याबाबतचा खुलासा आता आर. अश्विन याने केला आहे.
काय म्हणाला आर. अश्विन?
आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत आर. अश्विन यांनी सांगितलं की, “वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात आलो. तेव्हा विराट कोहलीनेमला एक चेंडू खेळण्यासाठी जवळपास सात पर्याय दिले होते. तेव्हा विराट कोहलीच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्यात विजयाच भूत स्पष्ट दिसत होतं. असं वाटत होतं की तो दुसऱ्या ग्रहावरच आहे. विराट कोहलीने या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. हा एक सर्वोत्तम सामना होता.”
त्या सामन्यात कशी होती स्थिती
भारताला विजयासाठी शेवटच्या षटकातील दोन चेंडूत दोन हव्या होत्या. दिनेश कार्तिक बाद झाला आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आर. अश्विन मैदानात उतरला होता. एक चेंडू आणि दोन धावा अशी स्थिती होती. तेव्हा विराट आणि अश्विन यांच्यात चर्चा झाली आणि अश्विन स्ट्राईकला आला.
मोहम्मद नवाज चेंडू टाकला आणि आर. अश्विन पुढे सरकला चेंडू वाईड केला. त्यानंतर आर. अश्विनने मिड ऑफवरून चौकार मारला आणि भारताला विजय मिळाला. यासह भारताने 2021 मधील हिशेब चुकता केला.
वनडे वर्ल्डकप 2023
आयसीसीने वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 15 ऑक्टोबर 2023 रोजी आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत पाकिस्तान खेळणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान सात वेळा आमनेसामने आले. सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.