T20 Women World Cup : दक्षिण आफ्रिकेची लेडी ‘उमरान मलिक’, महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान बॉल
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये अटीतटीचा सामना झाला. रोमहर्षक सामन्यात 6 धावांनी आफ्रिकेने विजय मिळवला होता. आफ्रिकेची महिला खेळाडू शबनम ईस्माइलने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
केपटाऊन : टी-20 महिला वर्ल्ड कप मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये अटीतटीचा सामना झाला. रोमहर्षक सामन्यात 6 धावांनी आफ्रिकेने विजय मिळवला होता. या विजयासह आफ्रिका संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला आहे. इतंकच नाहीतर आफ्रिकेची महिला खेळाडू शबनम ईस्माइलने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
शबनम ईस्माइलने महिलांच्या क्रिकेटमधील दुसरा सर्वात वेगवान बॉल टाकला आहे. सेमी फायनल सामन्यामध्ये तिने 128 ताशी वेगाने बॉल टाकला. यासंदर्भात टीव्हीवर दाखवण्यात आलं होतं. मात्र आयसीसीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. या सामन्यात शबनमने 3 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये सोफिया डन्कल (2), एलिस कॅप्सी (0) आणि हैदर नाईट (1) यांना बाद करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 2021 पर्यंत महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणजे भारतातील शिखा पांडेने 131 ताशीवेगाने बॉल टाकला होता.
दक्षिण आफ्रिकेचा 6 धावांनी विजय झाला आहे. साऊथ आफ्रिकेने विजयााठी 165 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 158 धावाच करता आल्या. आफ्रिकेने या विजयासह पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
इंग्लंडकडून नॅट क्विवर ब्रंट हीने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. कॅप्टन हिथर नाईटने 31 धावांचं योगदान दिलं. ओपनर डॅनियले व्याटने 34 धावा केल्या. तर सोफिया डंकले 28 रन्स करुन माघारी परतली. मात्र या चौघींचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही आणि इथेच सामना फिरला.
इंग्लंडची आश्वासक सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी सोफिया आणि डॅनियले या दोघींनी 53 धावांची अर्धशतकी भागीदारी केली होती. मात्र इंग्लंडने 53 धावांवर 2 विकेट्स गमावले. त्यानंतर इंग्लंडने छोटेखानी पार्टनरशीप केल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेने ठराविक अंतराने विकेट्स घेतल्याने इंग्लंडचं अंतिम सामन्यात पोहचण्याचं स्वप्न भंगलं.