IND vs AUS : भारतीय खेळाडूंनी सेमीफायनलमध्ये ‘या’ दोन चुकांनी चुकांनी संघाला टाकलं संकटात
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सेमी फायनलमध्ये भारतीय महिला संघाने मोठी चूक केली. यामुळे पराभवचाही सामना करावा लागू शकतो.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सेमी फायनलमध्ये भारतीय महिला संघाने मोठी चूक केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने भारताला 20 ओव्हर्समध्ये 172 धावा केल्या. खेळाडूंच्या खराब फिल्डिंगचा संघाला जबरदस्त फटका बसला. कारण यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या 70 धावा जास्त झाल्या. पॉवरप्लेनंतर संघासाठी राधा यादव नऊवं षटक टाकत होती, त्यामधील दुसऱ्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगचा झेल रिचा घोषला घेता आला नाही. त्यानंतरच्या दुसऱ्याच षटकात परत एकदा झेल सुटला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी फलंदाज खेळत होती.
दोन्ही फलंदाजांचे झेल सोडले गेले होते त्यावेळी मेग लॅनिंग 1 धाव आणि बेथ मुनीच्या 32 धावा झाल्या होत्या. जीवदान मिळाल्यानंतर दोघींनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. 12 व्या षटकात मुनी बाद झाली होती मात्र तिने त्यानंतर 12 चेंडूत 22 धावा केल्या होत्या. दुसरीकडे कर्णधार लॅनिंग शेवटपर्यंत नाबाद राहिली. दोन झेल घेतले असते तर 70 धावा यांच्या बॅटमधून गेलेल्या झाल्या नसत्या आणि भारतासाठी आणखी कमी धावांचं लक्ष्य राहिलं असतं.
ऑस्ट्रेलियाचा डाव एलिसा हिली आणि बेथ मूनी या जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघींनी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एलिसा हिली राधा यादवच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाली. त्यानंतर मूनी आणि मेग लॅनिंगनं डाव सावरला. दोघांची संघाची धावसंख्या 88 पर्यंत नेली.
शिखा पांडेच्या गोलंदाजीवर बेथ मूनी तंबूत 54 धावा करून परतली. त्यानंतर लॅनिंगनं आपली खेळी सुरुच ठेवली. तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर गार्डनर दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. ती 31 धावा करून तंबूत परतली.
मेग लॅनिंग आणि ग्रेस हॅरिस जोडी फार काही करू शकली नाही. हॅरीस शिखा पांडेच्या गोलंदाजीवर 7 धावा करून बाद झाली. त्यानंतर गोलंदाजांना मेग लॅनिंग आणि एलिसे पेरी ही जोडी फोडता आली नाही. रेणुका सिंगने सर्वात महागडं षटक टाकलं. तिने 4 षटकात 41 धावा दिल्या. तिला एकही गडी बाद करता आला नाही. शिखा पाडे (2), राधा यादव 1 आणि दीप्ती शर्मानं 1 गडी बाद केला. तर स्नेह राणाला एकही गडी बाद करता आला नाही.
दरम्यान, भारताची सुरूवात खराब झाली, शफाली वर्मा 9, स्मृती मंधाना 2 आणि यास्तिका भाटिया 4 यांना मोठी खेळी करत आली नाही. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला असून आता हरमनप्रीत कौर आणि जेमिमा मैदानात आहेत.