Cricket : वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये पडद्यामागून मोलाचं योगदान देणाऱ्या चॅम्पियनचं निधन

Cricket Retirement : कसोटी आणि वन डे मालिका जिंकल्यानंतर टी-20 मालिकाही जिंकण्यासाठी तयार आहे. मात्र अशातच टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.

Cricket : वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये पडद्यामागून मोलाचं योगदान देणाऱ्या चॅम्पियनचं निधन
भारतामध्ये यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. तिकीटांची खरेदी झाली असून आता मोठी तारांबळ उडताना दिसणार आहे.
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 5:56 PM

मुंबई : टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून कसोटी आणि वन डे मालिका जिंकल्यानंतर टी-20 मालिकाही जिंकण्यासाठी तयार आहे. मात्र अशातच टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाने 2007 साली पहिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला होता. त्यावेळी टीम इंडियाचे मॅनेजर असणाऱ्या सुनील देव यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजारामुळे वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

1996 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि 2014 च्या इंग्लंड दौऱ्यावरही ते टीम इंडियाचे प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. सुनील देव यांचा जन्म 30 मे 1947 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. सुनील देव यांनी दिल्ली संघाकडून प्रथम श्रेणी सामना खेळला होता. एकमेव सामन्यात त्याने 42 धावा त्यांनी केल्या होत्या. सुनील देव हे बॅट्समन होते.

2007 साली वन डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया साखळी फेरीतून बाहेर पडली होती. त्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी महेंद्र सिंग धोनीकडे सोपवण्यात आली होती. वन डे वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली होती. मात्र महेंद्र सिंग धोनीसोबत नव्या दमाचे खेळाडू होते. या नवीन पोरांना घेऊन धोनीने जगाला तोंडात बोटं घालायला भाग पाडलं होतं. पहिला टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. धोनीने फायनल सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरलं होतं.

दरम्यान, सुनील देव तेव्हा या चॅम्पियन संघाचे मॅनेजर होते. सुनील देव यांनी  बीसीसीआयच्या उपसमित्यांमध्ये उपसमित्यांमध्ये सुनील देव यांनी काम पाहिलं होतं. पहिल्या टी-20 वर्ल्ड कप संघाचे ते मॅनेजर म्हणनू त्यांनी काम पाहिलं होतं.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.