T20 World Cup :…असं झालं तर आयसीसीने दिला इशारा, सुपर 8 फेरीपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत!
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील संघ आता हळूहळू निश्चित होत आहेत. आठ पैकी चार संघांनी सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. यात ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. तर उर्वरित चार संघांसाठी चुरस आहे. असं असताना सुपर 8 फेरीपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघ आयसीसीच्या रडावर आला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता पुढे पुढे सरकत आहे. सुपर 8 फेरीची उत्सुकता लागून आहे. या फेरीतून चार संघ उपांत्य फेरीत धडक मारणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन संघावर कारवाईची टांगती तलवार आहे. ब गटातून ऑस्ट्रेलियाने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना स्कॉटलँडसोबत आहे. या सामन्यावर इंग्लंडचं सुपर 8 फेरीचं ठरणार आहे. असं असताना वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. गतविजेत्या इंग्लंडला बाहेर करण्यासाठी हरावं लागलं तरी चालेल असं त्याने सांगितलं होतं. या वक्तव्याची आता आयसीसीने गंभीर दखल घेतली आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियन संघाला सामन्याआधीच तंबी दिली आहे. या सामन्याचा निकाल पूर्वनियोजित असल्याचं सिद्ध झालं तर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श दोन सामन्यांची बंदी घालण्यात येईल. हे दोन्ही सामने सुपर 8 फेरीतील असतील त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे. सुपर 8 फेरीत दिग्गज संघांचा सामना करावा लागणार आहे. अशाच मोठा फटका बसू शकतो.
नियमानुसार, आयसीसी स्पर्धेत मुद्दामहून एखाद्या सामन्यात पराभव स्वीकारला आणि त्याचा परिणाम इतर संघावर झाला तर कारवाई केली जाते. यासाठी कर्णधाराला दोषी ठरवून त्याच्यावर बंदी घातली जाईल. इतकंच काय गांभीर्य ओळखून सामना फीच्या 50 टक्के रक्कमेचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श याला चार डिमेरिट गुण आणि दोन निलंबन गुणांसह सुपर 8 मधील दोन सामन्यांना मुकावं लागले. मुद्दामहून सामना हारला आणि त्यात दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.
इंग्लंडचं सुपर आठ फेरीचं संपूर्ण गणित हे ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड सामन्यावर अवलंबून आहे. इंग्लंडने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी एका सामन्यात पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. स्कॉटलँडचे पाच गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकले तर सात गुण होतील आणि सहज सुपर 8 फेरी गाठतील. पण हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर मात्र इंग्लंडला एक संधी आहे. इंग्लंडला साखळी फेरीतील उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.