ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने टी20 क्रिकेटमध्ये मोडला आणखी एक विक्रम, पाकिस्तानच्या खेळाडूचा महाविक्रम धुळीस
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने नवा विक्रम रचला आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर अक्षरश: नांगी टाकली आहे.
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील 14वा सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे अक्षरश: नांगी टाकली आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण या सामन्याचा निकाल दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. सोफी मोलिन्यूक्सने चौथ्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला विजय मिळवून दिला. मुनीबा अलीची विकेट घेतली. त्यानंतर सदाफ शम्सही काही खास करू शकली नाही. ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शूटने तिची विकेट काढली आणि एक विक्रम रचला.
सदाफ शम्सला बाद करताच मेगन शूटच्या नावावर टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटम विकेट झाल्या आहेत. यासह तिने पाकिस्तानच्या निदा दारला मागे टाकलं आहे. तसेच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. 116 व्या सामन्यात तिने ही कामगिरी केली आहे. मेगनकडे या स्पर्धेत 150 विकेटचा पल्ला गाठण्याची संधी आहे. मेगन सध्या फॉर्मात असून न्यूझीलंडविरुद्ध 3 गडी बाद केले होते. यासह तिने टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. यासह तिने शबनम इस्माइलला मागे टाकलं आहे. शबनमच्या नावार 43 विकेट आहेत. तर मेगनच्या आता 47 विकेट झाल्या आहेत. निदा दार या सामन्यात खेळत आहे. दुसऱ्या डावात तिने ऑस्ट्रेलियाच्या विकेट घेण्यात यश मिळवलं तर पुन्हा दोघांमधील सामना बरोबरीत येईल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर/कर्णधार), सिद्रा अमीन, निदा दार, सदफ शमास, आलिया रियाझ, इरम जावेद, ओमामा सोहेल, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल, सय्यदा अरूब शाह
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), बेथ मूनी, एलिस पेरी, ऍशलेग गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेअरहॅम, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, टायला व्लामिंक