वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत मोठी उलटफेर पाहायला मिळाला आहे. उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून वचपा काढला. मागच्या पर्वात जेतेपदाचं स्वप्न ऑस्ट्रेलियामुळे हुकलं होतं. त्याची परतफेड या स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने केली आहे. ऑस्ट्रेलिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सलग 15 विजय मिळवले होते. त्यानंतर 16 व्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियाने मागच्या आठ पर्वातील सहा पर्वात जेतेपद मिळवलं आहे. मात्र सातव्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार तहिला मॅकग्राथ हिने आपलं मन मोकळं केलं आहे.
ताहिला मॅकग्राथ म्हणाली की, ‘हे कडू औषध घशाखाली उतरवणं खरंच कठीण आहे. आजची रात्र खूपच वाईट गेली. आम्ही या सामन्यात कमी पडलो. त्याचा फटका मोठ्या स्पर्धेत अशा पद्धतीने बसतो. आम्ही दक्षिण अफ्रिकेच्या खेळीचं कौतुक करतो. आम्हाला ही वर्ल्डकप स्पर्धा कायम स्मरणात राहील. आम्ही स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती. आम्ही कोणतीही कसर सोडली नाही. आम्हाला ते खूपच अवघड वाटले, दक्षिण आफ्रिकेने चांगली गोलंदाजी केली, त्यांनी आमच्यासाठी जोखीम घेणे कठीण केले, अर्ध्या टप्प्यावर, 140-150 बरोबरीचे वाटले परंतु दक्षिण आफ्रिकेने इतकी चांगली फलंदाजी केली आणि ती पूर्णपणे वेगळी विकेट असल्यासारखे वाटले.”
“आम्ही विकेटवर सोपे ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो आणि आम्ही ते पूर्ण करू शकलो नाही आणि आम्हाला शिक्षा झाली, आम्ही दोन ओव्हर्स आणि दोन विकेट्स म्हणत राहिलो, जेणेकरून आम्हाला गती परत मिळवता येईल पण आम्ही करू शकलो नाही.”,असंही ताहिला मॅकग्राथ पुढे म्हणाली.
दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड म्हणाली की, ‘हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम विजयांपैकी एक आहे. इतर काही मुलींनीही तसेच सांगितले. विजयी धावांचा पाठलाग करताना अनेकेने शानदार फलंदाजी केली. आमच्यासाठी हे एक चांगले वर्ष आहे. खरोखर सामूहिक प्रयत्न आहे. आम्ही कदाचित इतर संघांबद्दल थोडे अधिक विश्लेषण केले, काही योजना काम केल्याचा आनंद झाला आणि मला वाटलते की गोलंदाजांनी त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली.”