BAN vs NED: नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात मोठा अनर्थ टळला, थोडक्यासाठी खेळाडू बचावला
Bangladesh vs Netherlands: बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामन्यादरम्यान हेल्मेटमुळे मोठा अनर्थ टळला आहे. नक्की काय झालं? जाणून घ्या.
हेल्मेटमुळे आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात मोठा अनर्थ टळला आहे. बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथे खेळवण्यात येत आहे. नेदरलँड्सने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशच्या बॅटिंगदरम्यान नेदरलँड्सच्या गोलंदाजाने टाकलेला बॉल हा थेट फलंदाजाच्या हेल्मेटमध्ये जाऊन अडकला. मात्र सुदैवाने फलंदाजाला काही झालं नाही, त्यामुळे अनर्थ टळला. पण काही वेळ खेळ निश्चित थांबवण्यात आला.
नक्की काय घडलं?
नेदरलँड्सकडून विव्हियन किंगमा याने तिसरी ओव्हर केली. या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर हा सर्व प्रकार घडला. विव्हियन किंगमा याने टाकलेला बॉल तांझिद हसन याच्या हेल्मेटमध्ये जाऊन अडकला. सुदैवाने हेल्मेट असल्याने अनर्थ टळला. तांझिदने त्यानंतर हेल्मेट काढला. त्यानंतर हेल्मेट पीचवर आपटला आणि बॉल वेगळा केला. तेवढ्यात बांगलादेशचे डॉक्टर मैदानात आले. त्यांनी तांझिदला बोट दाखवून त्याला नीट दिसतंय की नाही, हे पाहिलं. सुदैवाने तांझिदला सर्व काही नीट दिसत होतं. त्यामुळे काही वेळ सामना थांबवण्यात आला. तांझिद सुखरुप असल्याने क्रिकेट चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान तांझिदने नेदरलँड्स विरुद्ध 26 बॉलमध्ये 134.62 च्या स्ट्राईक रेटने 1 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. तांझिद आणि शाकिब अल हसन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. तांझिद आऊट झाल्याने बांगलादेशचा स्कोअर 3 आऊट 71 असा झाला.
तांझिद हसन सुखरुप
A rare moment in cricket 🤯
Vivian Kingma’s bouncer got stuck in Tanzid Hasan’s helmet! 😳#T20WorldCup #BANvNED pic.twitter.com/jSkDpu3qKh
— Sportskeeda (@Sportskeeda) June 13, 2024
नेदरलँड्स प्लेइंग ईलेव्हन : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकेल लेविट, मॅक्स ओडोड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, लोगान व्हॅन बीक, टिम प्रिंगल, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि विव्हियन किंगमा.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.