CAN vs IRE: आयर्लंड उलटफेरची शिकार, रंगतदार सामन्यात कॅनडा 12 धावांनी विजयी
Canada vs Ireland Match Result: आयर्लंडला उलटफेरचा सामना करावा लागला आहे. कॅनडाने 12 धावांनी विजय मिळवला आहे. कॅनडाने या विजयासह पाकिस्तानला पॉइंट्स टेबलमध्ये मागे टाकलं आहे.
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या चुरशीच्या सामन्यात कॅनडाने उलटफेर केला आहे. कॅनडाने आयर्लंडवर 12 धावांनी विजय मिळवला आहे. कॅनडाने आयर्लंडला विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं होतं. आयर्लंडने या धावांचा 19 व्या ओव्हरपर्यंत शानदार पाठलाग केला. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला. आयर्लंडला विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. मात्र जेर्मी गॉर्डन याने 17 धावांचा बचाव शानदार बचाव केला. आयर्लंडला अवघ्या 5 धावाच करता आल्या.
यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर क्रिकेट चाहत्यांना 24 तासात दुसरा उलटफेर पाहायला मिळाला. यूएसएने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता कॅनडाने तुलनेत अनुभवी असलेल्या आयर्लंडला पराभवाची धुळ चारली आहे. आयर्लंडच्या सलामी जोडीने विजयी धावांचा पाठलाग करताना 26 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर कॅनडाने ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे आयर्लंडची स्थिती 6 बाद 59 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर जॉर्ज डॉकरेल आणि मार्क एडायेर या दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत आयर्लंडला सामन्यात कायम ठेवलं. त्यामुळे विजयाच्या आशा कायम राहिल्या.
आयर्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती. डॉकरेल आणि एडायेर सेट जोडी मैदानात होती. तर जेर्मी गॉर्डन याने शेवटची ओव्हर टाकली. जेर्मीने दुसऱ्या बॉलवर मार्क एडायरला 34 धावांवर कॅच आऊट करत ही जोडी फोडली आणि कॅनडाचा विजय निश्चित केला. डॉकरेल आणि एडायेर या दोघांनी सातव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेर्मीने हुशारीने उर्वरित 4 बॉल टाकून कॅनडाला विजयी केलं. आयर्लंडकडून एडायर व्यतिरिक्त जॉर्ज डॉकरेल याने 30 धावांची नाबाद खेळी केली. मात्र त्याला टीमला विजयी करता आलं नाही. कॅनडाकडून डिलन हेलिगर आणि जेरेमी गॉर्डन या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जुनैद सिद्दीकी आणि कॅप्टन साद बिनर झफर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
त्याआधी आयर्लंडने टॉस जिंकून कॅनडाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. कॅनडाकडून निकोलस कीर्टन याने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. श्रेयस मोव्वा याने 37 धावांचं योगदान दिलं. प्रगत सिंह 18 आणि आरोन जोन्स याने 14 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना खास काही करता आलं आही. आयर्लंडसाठी बॅरी मॅककार्थी आणि क्रेग यंग या जोडीने प्रत्येक 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्क एडेअर आणि गॅरेथ डेलेनी या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
कॅनडाने विजयाचं खातं उघडलं
Canada WIN in New York! 🇨🇦
A superb bowling performance from them against Ireland sees them register their first Men’s #T20WorldCup win 👏#CANvIRE | 📝: https://t.co/rYLPhX7ldC pic.twitter.com/axdtyEFrDg
— ICC (@ICC) June 7, 2024
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), दिलप्रीत बाजवा, डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी आणि जेरेमी गॉर्डन.
आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कर्णधार),अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि क्रेग यंग.