T20 World Cup : संजू सॅमसनची संघात निवड कशी झाली? अजित आगरकरने सांगितलं नेमकं काय ते

आयपीएल स्पर्धा सुरु असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून रिंकू सिंहला डावलण्यात आलं आहे. तर संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संजू सॅमसनच्या निवडीबाबत अजित आगरकरने सांगितलं की...

T20 World Cup : संजू सॅमसनची संघात निवड कशी झाली? अजित आगरकरने सांगितलं नेमकं काय ते
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 5:52 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये होणारा वर्ल्डकप खेळणार आहे. या संघात अनेक खेळाडू असे आहेत की, जे आयपीएलमध्ये ओपनिंग करत आहेत. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये कॉम्बिनेशन कसं असेल? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली हे चार खेळाडू आयपीएलमध्ये ओपनिंग करत आहेत. त्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की नाही या बाबतही चर्चा रंगली आहे. असं असताना संघ जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष संजू सॅमसन यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोघांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांना संजू सॅमसनच्या निवडीबाबत आणि रोलबाबत प्रश्न विचारला. तेव्हा अजित आगरकरने त्या प्रश्नाचं उत्तर देत त्या मागचं गणित समजावून सांगितलं. तसेच केएल राहुलला टीममधून वगळल्याचं कारणंही सांगितलं.

“केएल राहुल आयपीएलमध्ये ओपनिंग करत आहे. आम्ही प्रामुख्याने मधल्या फळीतील पर्याय शोधत होतो. त्यामुळे आम्हाला वाटले की सॅमसन आणि पंत यासाठी अधिक योग्य आहेत. सॅमसन लाईनअपमध्ये कुठेही फलंदाजी करू शकतो. त्यामुळे संघाला जी गरज आहे ती निवड योग्य ठरली. कोण चांगले आहे यावरून निवड करता येत नाही,” असं निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना 5 जूनला होणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना न्यूयॉर्कमध्ये होईल. त्यानंतर कॅनडा आणि अमेरिकाशी सामना होईल. या गटातून टॉप 2 संघ पुढच्या फेरीत खेळतील. एकूण 20 संघ स्पर्धेत सहभागी असून त्याची चार गटात 5 संघात विभागणी करण्यात आली आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.. राखीव खेळाडू:  शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.