IND vs ENG Semi Final : विराट कोहलीने आज ‘तो’ रेकॉर्ड टाळवाच, नाहीतर टीम इंडियाचा पराभव निश्चित!

टीम इंडियासाठी आजचा सेमी फायनल सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. इंग्लंडला पराभूत केल्यावर टीम इंडियाल थेट फायनल खेळणार आहे. मात्र विराट कोहलीचा एक रेकॉर्ड टीम इंडियाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरू शकतो. कोणता आहे तो रेकॉर्ड जाणून घ्या.

IND vs ENG Semi Final : विराट कोहलीने आज 'तो' रेकॉर्ड टाळवाच, नाहीतर टीम इंडियाचा पराभव निश्चित!
bumrah virat and rohit
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 6:13 PM

टी-20 वर्ल्ड कप 2024 ची दुसरी फायनल काही वेळात सुरू होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं असणार आहे. टीम इंडियाला मागील सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोर जावं लागलं होतं. त्यावेळी इंग्लंड संघानेच टीम इंडियाला बाहेर करत फायनलचं स्वप्न मोडलं होतं. या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहित शर्मा अँड कंपनीला असणार आहे. या सामन्यात एक असा खेळाडू आहे ज्याने टीम इंडिया जितक्या वेळा सेमी फायनलमध्ये गेलीये तितक्या वेळा अर्धशतक ठोकलंय. आजच्य सामन्यात या खेळाडूकडून सर्वांनाच मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. मात्र हा खेळाडू असा आहे ज्याने अर्धशतकी खेळी केल्यावर टीम इंडियाला खास असं यश मिळालेलं नाही.

हा खेळाडू आहे तरी कोण? ज्याने टीम जेव्हा जेव्हा सेमी फायनलमध्ये गेली तेव्हा अर्धशतक केलं आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहली आहे. विराट कोहली याने आपल्या करियरमधील पहिला टी-20 वर्ल्ड कप 2012 साली खेळला होता. तेव्हापासून टीम इंडियाने एक दोनदा नाहीतर तीनवेळा सेमी फायनल गाठली आहे.

2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा सामना झाला होता. त्या सामन्यातही विराट कोहली याने 44 चेंडूत 72 धावांची दमदार खेळी केली होती. मात्र टीम इंडियाच्या पदरी निराशा पडली होती. त्यानंतर 2016 मध्येही वेस्ट इंडिज आणि टीम इंडियाचा सेमी फायनल सामना झालेला. तेव्हा विराटने 47 चेंडूत 89 धावांची खेळी केल होती. मात्र त्या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला होता. तिसरा म्हणजे 2022 साली इंग्लंडविरूद्ध झालेल्या सेमी फायनलमध्येही विराटने 50 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियाचा पराभव झाल होता.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली याने एकही अर्धशतकी खेळी केलेली नाही. विराटने आजच्या सामन्यात मोठी खेळी तर टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमवलेला नाही.  टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामना संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. तर 7.30 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडून सर्वांनाच  अपेक्षा आहे. कोहली आज कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.