IND vs ENG Semi Final Dream11 : टीम इंडिया आणि इंग्लंड मॅचसाठी लावा ही ड्रीम 11, होताला मालामाल
Ind vs eng semi final Dream 11 : टी-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरा सेमी फायनल सामना काही वेळात सुरू होणार आहे. या सामन्यासाठी ड्रीम 11 ला टीम लावत असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या टीमचा फायदा होऊ शकतो. आजच्या सामन्यात खेळाडूला कॅप्टन केल्यावर तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतो. जाणून घ्या.
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडिया आणि इंग्लंड एकमेकांना भिडणार आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मागील सेमी फायनलमध्ये इंग्लंडने केलेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी आपली सर्व ताकद लावताना दिसेल. आजच्या सामन्यात फक्त एका खेळाडूला नाहीतर सर्वांनाच चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्याकडे क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ड्रीम 11 टीम लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.
यष्टिरक्षक: जोस बटलर, रिषभ पंत, फलंदाज: रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, फिल सॉल्ट, अष्टपैलू: हार्दिक पंड्या, अक्षर पटेल गोलंदाज: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
ड्रीम 11 मध्ये तुम्ही असा संघ लावला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. इंग्लंडचा कॅप्टन बटलर स्वत:कीपर असून तो सलामीला फलंदाजीसाठी येतो. तर टीम इंडियाचा रिषभ पंत आता वन डाऊनला खेळण्यासाठी येत आहे. त्यामुळे त्यालाही कीपर म्हणून टीममध्ये स्थान दिलं आहे. फलंदाजीमध्ये रोहित शर्माचा फॉर्म पाहता टीम इंडियाकडून यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह याला संघात स्थान द्या. कारण सध्या जगातील एक नंबरचा आणि सर्वात धोकादायक बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बुमराहने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने टीम इंडियाच्या बाजूने झुकवले आहेत. त्यामुळे बुमराहला कॅप्टनही करू शकता. दुसरं म्हणजे उपकर्णधार म्हणून हार्दिक पंड्या याची निवड करा.
भारताची संभाव्य इलेव्हन: रोहित शर्मा (C), विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
इंग्लंडची संभाव्य इलेव्हन: फिल सॉल्ट, जोस बटलर (C & WK), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, रीस टोपले, आदिल रशीद