IND vs ENG : उपांत्य फेरीतही विराट कोहलीचा फुसका बार, महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा तीच चूक केली

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला. नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने गोलंदाजी घेतली. विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र त्याचा भंग झाला आहे.

IND vs ENG : उपांत्य फेरीतही विराट कोहलीचा फुसका बार, महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा तीच चूक केली
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 9:49 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी भारत आणि इंग्लंड आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी घेतली. या सामन्यात तरी विराट कोहलीची बॅट तळपेल अशी क्रीडारसिकांना अपेक्षा होती. मात्र तसं काही झालं नाही. या खेळपट्टीवर बाउंस कमी होत असल्याने विराट कोहली चाचपडताना दिसला. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नसल्याचं पाहून इंग्लंडचे गोलंदाजही हावी झाले. विराट कोहली फटके मारताना अनेकदा चुकला. त्यामुळे प्रत्येक चेंडू सुटताना क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढत होती. अखेर नको तेच झालं. रीसी टोपलेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होत तंबूत परतला. त्यामुळे विराट कोहलीचा फॉर्म नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. असं असूनही विराट कोहलीला वारंवार प्लेइंग 11 मध्ये संधी दिली जात असल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. विराट कोहलीच्या अनुभवाचा टीम इंडियाला कुठेच फायदा होताना दिसत नाही. उपांत्य फेरीपर्यंतच्या सर्व सामन्यात फेल ठरल्याचं दिसून आलं.

नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या विराट कोहलीला पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली. दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर सहाव्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. दुसरं षटक जोफ्रा आर्चर टाकण्यासाठी आला. त्याचा पहिला चेंडू विराट कोहलीने निर्धाव घालवला. त्यानंतर एक धाव घेत रोहितला स्ट्राईकला दिली. पुढचे चार चेंडू रोहित शर्मा खेळला आणि तिसऱ्या षटकासाठी विराटला स्ट्राईक मिळाली.

रिसी टोपले तिसरं षटक टाकण्यासाठी आला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहली चाचपडला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. मग दोन धावा आल्या. पण चौथ्या चेंडूवर नको तेच झालं. विराट कोहली क्लिन बोल्ड होत तंबूत परतला. विराट कोहलीने 9 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 9 धावा केल्या. पुन्हा एकदा विराट कोहली एकेरी धावसंख्या करून तंबूत परतला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले.

Non Stop LIVE Update
'हा माझा शेवटचा...', T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा
'हा माझा शेवटचा...', T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा.
वर्ल्डकप जिंकलो रे...जय हो...T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरल भारतान नाव
वर्ल्डकप जिंकलो रे...जय हो...T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरल भारतान नाव.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.