IND vs SA Final : भारत दक्षिण अफ्रिका संघातील या खेळाडूंवर असेल सामन्याची मदार, कोण ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा विजेता अवघ्या काही तासांनंतर ठरणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिकेत जेतेपदासाठी लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाच्या काही खेळाडूंवर नजर असणार आहे. हे खेळाडू कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता ठेवतात.
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होत आहे. भारतीय संघाला जेतेपद मिळवण्याची दुसऱ्यांदा, तर दक्षिण अफ्रिकेला पहिली संधी आहे.दक्षिण अफ्रिकेच्या माथ्यावर असलेला चोकर्सचा डाग पुसण्याची वेळ आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे आता कोण जिंकणार? कोण हरणार? याची उत्सुकता आहे. या सामन्यात भारताचे 7 आणि दक्षिण अफ्रिकेचे 4 खेळाडू कमाल करू शकतात. भारताकडून ऋषभ पंत, रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांची नाव आघाडीवर आहेत. तर दक्षिण अफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेन, एडन मार्करम, क्विंटन डी कॉक आणि एनरिक नॉर्त्जे हे चार खेळाडू आघाडीवर असतील.
बार्बाडोसमधील केन्सिंगटन ओव्हल मैदानात पहिल्या काही षटकांमध्ये सीम पाहायला मिळू शकतो. यामुळे पॉवरप्लेमध्ये खोऱ्याने धावा करणं कठीण जाईल.इतकंच काय तर या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना उसळी मिळेल. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये कोण कशी फलंदाजी करतं यावर लक्ष काही अवलंबून आहे. या सामन्यात 72 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तापमना 27 ते 30 अंश सेल्सियस पर्यंत असेल. तसेच वातावरणात दमटपणा असेल. वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 50 किमी असेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत : विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यराम यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
दक्षिण अफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे , तबरेझ शम्सी.
दोन्ही संघाचे खेळाडू
दक्षिण अफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार) , ओटनील बार्टमन , गेराल्ड कोएत्झी , क्विंटन डी कॉक (विकेटकीपर) , ब्योर्न फॉर्च्युइन , रीझा हेंड्रिक्स , मार्को जॅन्सेन , हेनरिक क्लासेन , केशव महाराज , डेव्हिड मिलर , ॲनरिक नॉर्टजे , कागिसो रबाडा , सेंट ट्रायब्स्स्टन , ट्रायब्स्स्टन , रियान टॅब्सी.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , हार्दिक पंड्या , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली , सूर्यकुमार यादव , ऋषभ पंत , संजू सॅमसन , शिवम दुबे , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , कुलदीप यादव , युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंह , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.