IND vs ENG : भारत इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचं दाट सावट, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. आता भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. 27 जूनला गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियवर हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

IND vs ENG : भारत इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचं दाट सावट, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला?
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 2:30 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा थरार आता संपला असून आता उपांत्य फेरीचे वेध लागले आहेत. उपांत्य फेरीतील पहिला सामना दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आणि दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. 27 जूनला हे दोन्ही सामने पार पडणार आहेत. दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर एक दिवस राखीव ठेवला आहे. मात्र भारत इंग्लंड सामन्यात तसं काही नाही. सामना संपवण्यासाठी अतिरिक्त तास मिळणार आहेत. पण पाऊस पडतच राहिला तर रद्द करण्याशिवाय पर्याय नाही. अॅक्युवेदरनुसार, 27 जून रोजी गयानामध्ये 88टक्के पावसाछी शक्यता आहे. मेघगर्जनेसह 18 टक्के पाऊस पडेल. त्यामुळे या सामन्यावर पावसाचं गडद सावट आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सामना सुरु होईल. तेव्हा भारतात रात्रीचे 8 वाजलेले असतील. या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? हा प्रश्न आहे.

भारत आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर हा सामना संपवण्यासाठी सामन्याव्यतिरिक्त 250 अतिरिक्त मिनिटे देण्यात आली आहेत. म्हणजेच 4 तास आणि 10 मिनिटं अतिरिक्त मिळतील. यातच हा सामना संपवायचा आहे. जर पाऊस पडतच राहिला तर मात्र हा सामना रद्द करावा लागेल. दुसरं हा सामना एकही चेंडू न खेळता रद्द झाला तर मग भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण सुपर 8 फेरीत भारताने तीन पैकी तीन सामने जिंकून अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे अंतिम फेरीसाठी भारताला पसंती मिळेल.

मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत केलं होतं. आता पुन्हा एकदा इंग्लंडने ट्वीट करून भारताला ती आठवण करून दिली आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडीकडे आहे. कारण विजयानंतर या जोडीचं एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. राहुल द्रविडने टीम इंडियाची सूत्र हाती घेतली तेव्हा पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेला सामोरं गेला होता. तसेच कर्णधार म्हणून रोहित शर्माची वर्णी लागली होती.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.