भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटासाठी मोजावे लागणार इतके रुपये, आयसीसीवर चाहत्यांची आगपाखड

टी20 वर्ल्डकपसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. सर्वांना आतापासून भारत पाकिस्तान सामन्याचे वेध लागले आहेत. हा सामना थेट मैदानातून पाहण्यासाठी क्रीडारसिकांची तयारी सुरु झाली. यासाठी तिकीट आणि हॉटेल बुकींग सुरु झाली आहे. आयसीसीने या सामन्याद्वारे कमाई करण्याचा प्लान आखला आहे.

भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटासाठी मोजावे लागणार इतके रुपये, आयसीसीवर चाहत्यांची आगपाखड
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 8:28 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहे. 9 जूनला अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये हे दोन संघ आमनेसामने असतील. या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या चाहत्यांनी आतापासून मोर्चेबांधणी केली आहे. पण तिकीट मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. तिकीटाचे दर गगनाला भिडले आहेत. तरीही चाहते वाटेल ती किंमत मोजून हा सामना पाहण्याची तयारी करत आहेत. आता आयसीसीने या संधीचा फायदा घेण्याची तयारी केली आहे. अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी टी20 वर्ल्डकपलाला कमाईचं साधन बनवलं जात आहे. त्यामुळे तिकीटाच्या दर सामान्य व्यक्तींच्या हाताबाहेर गेले आहेत. आयपीएल फाउंडर ललित मोदी यांनी दावा केला आहे की, “आयसीसीने या सामन्याच्या डायमंड क्लब सीटसाठी 20 हजार डॉलर म्हणजेच 16 लाख 65 हजार रुपये घेत आहे. दुसरीकडे, क्लब तिकीटसाठी 2750 डॉलर म्हणजे 2 लाखा 29 हजार घेत आहे.” ललित मोदी तिकीटाच्या दरावरून आयसीसीवर भडकले आहेत आणि लुटेरा म्हणून उल्लेख केला आहे.

आयसीसीने आपल्या वेबसाईटवर या सामन्याच्या प्रीमियम क्लब लाउंज, कॉर्नर क्लब आणि डायमंड क्लब या तीन प्रकारचे तिकीट विक्रीस ठेवले आहेत. प्रीमियम क्लबसाठी 2500 डॉलर म्हणजेच 2 लाख 8 हजार रुपये, कॉर्नर क्लबसाठी 2750 डॉलर म्हणजेच 2 लाख 29 हजार रुपये आणि डायमंड क्लबसाठी 10000 डॉलर म्हणजेच 8 लाख 32 हजार रुपये किंमत ठेवली आहे. त्यामुळे ललित मोदी यांनी केलेला दावा खोटा आहे. पण असं असूनही तिकीटांचा काळाबाजार सुरु असल्याचा आरोप क्रीडाप्रेमींनी केला आहे. दरम्यान एका रिपोर्टनुसार न्यूयॉर्कमधील हॉटेलचं बुकिंग वेगाने होत आहे. भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान ही मागणी आणखी वाढू शकते. त्यामुळे हॉटेलचं भाडं 10 पटीने वाढण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध हॉटेल एका दिवसासाठी 90 हजार रुपये चार्ज करते.

टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धा ऑस्ट्रेलियात झाली होती. तेव्हा भारत पाकिस्तान संघ एकाच गटात होते. हा सामना मेलबर्नमध्ये झाला होता. त्यावेळी 90 हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी दोन्ही संघाचे प्रेक्षक उत्सुक आहेत. यासाठी आतापासून तिकीट आणि हॉटेलची बुकिंग सुरु केली आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.