T20 World Cup : भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग झाला सुकर, कसं ते समजून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीसाठी सहा संघ निश्चित झाले आहेत. तर दोन संघांसाठी चुरस आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. असं असताना भारताचं सुपर 8 फेरीतलं गणित पाहता आरामात उपांत्य फेरी गाठेल, असं चित्र आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड, श्रीलंकेनंतर पाकिस्तानचा सुपर 8 फेरीआधीच पत्ता कट झाला आहे. अ गटातून भारत आणि अमेरिका या दोन संघांनी सुपर 8 फेरी गाठली आहे. अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. भारत संघ सुपर 8 फेरीत पोहोचला असून उपांत्य फेरीचा मार्गही सुकर झाला आहे. भारताचा सामना सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानशी होईल. तर बांगलादेश किंवा नेदरलँड यापैकी एक संघ सुपर 8 फेरीत पोहोचेल. या दोनपैकी एका संघाशी भारताचा तिसरा संघ असेल. अफगाणिस्तान आणि बांगलादेशने या स्पर्धेत भारताला कधीच पराभूत केलेलं नाही. त्यामुळे या दोन संघांना पराभूत करत टीम इंडिया उपांत्य फेरी गाठू शकते. भारताला सुपर 8 फेरीत फक्त 3 सामने खेळायचे आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया सोडली तर अफगाणिस्तान आणि (बांगलादेश किंवा नेदरलँड) दोन संघांना सहज पराभूत करू शकते.
भारताचा 20 जूनला पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर 22 जूनला बांगलादेश किंवा नेदरलँड यांच्यापैकी एक संघ असेल. तर 24 जूनला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. यात टीम इंडिया अफगाणिस्तान आणि बांगलादेशशी कधीही पराभूत झालेल नाही. जर बांगलादेशच्या जागी नेदरलँडचा संघ पोहोचला तरी असंच गणित असेल. भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये नेदरलँडविरुद्ध कधीही हारलेला नाही.
सुपर 8 फेरीत भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध बारबाडोसमध्ये होईल. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी एकच अनिर्णित ठरला आहे. उर्वरित सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये हे दोन संघ तीन वेळा भिडले आणि तिन्ही वेळा भारताने विजय मिळवला.
भारताने बांगलादेशविरुद्ध एकूण 13 सामने खेळले. त्यापैकी 12 सामन्यात भारताने आणि एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे. दोन्ही देशांमध्ये शेवटचा टी20 सामना एशियन गेम्समध्ये खेळले होते. भारताने हा सामना 9 विकेटने जिंकला होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. चारही सामने भारताने जिंकला.