भारताचं उपांत्य फेरीचं गणित फक्त एका सामन्यावर ठरणार, बांगलादेशविरुद्ध तशी चूक पडणार महागात
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात पार पडत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. या सामन्यावर दोन्ही संघांचं उपांत्य फेरीचं गणित असणार आहे. चला तर जाणून घेऊयात गट 1 मधील उपांत्य फेरीची गुंतागुंत
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. यापैकी दोन सामने जिंकून नेट रनरेट चांगला असेल तर उपांत्य फेरीचं तिकीट नक्की होणार आहे. भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध पार पडला. हा सामना भारताने 47 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला 28 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे या गटातून भारत आणि ऑस्ट्रेलिया हे उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र या फेरीत उलटफेर करण्याची ताकद अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात आहेत. भारताचा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. हा सामना भारताला काहीही करून जिंकावाच लागेल. कारण या फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने कायमच भारताची वाट रोखून धरली आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं गणित हे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ठरेल.
गट 1 मध्ये ऑस्ट्रेलिया 2 गुण मिळवून अव्वल स्थानी पोहोचली आहे. भारताच्या पारड्यातही 2 गुण आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा भारतापेक्षा चांगला आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा +2.471 इतका आहे, तर भारताचा नेट रनरेट हा +2.350 इतका आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण बांगलादेशचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी आहे. दुसरीकडे, भारताने सामना जिंकला तर बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
भारत बांग्लादेश 22 जून रोजी भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता होणार आहे. हा सामना अँटिगाच्या सर विवियन रिचर्ड्स मैदानात होणार आहे. त्यानंतर भारताचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी 24 जून रोजी होईल.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल.
बांगलादेश संघ: तन्झिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहिद ह्रिदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, तन्झिम हसन साकिब, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम, सौम्या सरकार.