T20 World Cup : भारत पाकिस्तान सामना होण्याआधीच खळबळ, तिकिटाचे दर पाहून भल्याभल्यांचे धाबे दणाणले
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे आतापासूनच वेध लागले आहेत. त्यासाठी 20 संघांची जोरदार तयारी सुरु आहे. तसेच चाहतेही आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उपस्थित राहण्यासाठी खटाटोप करत आहेत. त्यासाठी आतापासून तिकीट बुकिंग वगैरे सुरु आहे. असं असताना भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाचे दर पाहून धक्का बसेल. त्यापेक्षा घरूनच सामना बघितलेला बरा असं वाटेल.
मुंबई : भारत पाकिस्तान सामना पाहण्याची मेजवानी गेल्या काही वर्षांपासून फक्त आशिया कप आणि आयसीसी चषकांदरम्यान असते. त्यासाठी दोन्ही देशाचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. भारत पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे हा सामना पाहता यावा यासाठी आतापासून खटाटोप सुरु आहे. चाहते या सामन्याच्या तिकिटासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत. पण तिकिटाचे दर पाहून काही जणांना आपला आखुडता घ्यावा लागेल. तुम्ही कितीही मोठे चाहते असा पण पैशांपुढे काही एक चालणार नाही. 9 जून 2024 रोजी भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सामन्यासाठी री-सेल मार्केटमध्ये तिकीटाची किंमतीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिकिटाची अधिकृत किंमत 6 डॉलर म्हणजेच 497 रुपये आहे. पण भारत पाकिस्तान सामन्यासाठी हीच किंमत विना टॅक्स 400 डॉलर म्हणजेच 33,148 रुपये आहे.
स्टबहब आणि सीटगीक या प्लॅटफॉर्मवर तिकिटाच्या किंमती खूपच वरचढ आहेत. अधिकृत विक्री 400 डॉलर आहे, तिथे रीसेल साईटवर किंमत 40 हजार डॉलर आहे. म्हणजेच जवळपास 33 लाख रुपये इतकी आहे. इतर काही फी यात वर्ग केली तर ही किंम 50 हजार डॉलपर्यंत पोहोचते. म्हणजेच 41 लाख रुपये इतकी असेल.
यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, सेंकेड्री मार्केटमध्ये सुपर बाउल 58 ची किंमत 9 हजार डॉलर आहे. तर एनबीए फायलनसाठी कोर्टसाइट सीटची किंमत जास्तीत जास्त 24 हजार डॉलर आहे. पण टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सर्वात महाग तिकीट 1,75,000 डॉलर आहे. म्हणजेच जवळपास 1.4 कोटी रुपये इतकी आहे. यात इतर काही फी जोडली गेली तर ही किंमत 1.86 कोटींच्या घरात जाते.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान हे दोन्ही आठव्यांदा भिडणार आहेत. यापूर्वी झालेल्या सात सामन्यात भारताने सहा, तर पाकिस्तानने एका सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानने 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताला 10 विकेट राखून पराभूत केलं होतं.