T20 World Cup 2024 दरम्यान विराट कोहलीच्या मित्राची निवृत्तीची घोषणा
Cricket Retirement: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेदरम्यान स्टार ऑलराउंडरने निवृत्तीची घोषणा केली आहे. जाणून घ्या तो स्टार ऑलराउंडर कोण आहे?

नामिबिया क्रिकेट टीमला गतविजेत्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात डीएलएसनुसार 41 धावांनी पराभूत व्हावं लागलं. नामिबियाचा हा चौथा आणि शेवटचा सामना होता. नामिबियाने या मोहिमेतील शेवट विजयासह करण्यात अपयशी ठरली. नामिबिया सुपर 8 मध्ये पोहचू शकली नाही. नामिबियाला 4 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर -नामिबियाचा स्टार खेळाडू डेव्हीड विसे याने निवृ्त्त होत असल्याचं जाहीर केलं. डेव्हिडचा अशाप्रकारे इंग्लंड विरुद्धचा सामना हा त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा ठरला.
डेव्हिड विसे याने इंग्लंड विरुद्ध 12 बॉलमध्ये 27 धावांची खेळी केली. विसेने या खेळीत 2 चौकार ठोकले. विसेने 225 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. डेव्हिडने 1 विकेटही घेतली. डेव्हिडने इंग्लंडचा ओपनर फिल सॉल्ट याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विसेने 2 ओव्हरमध्ये 3 च्या इकॉनॉमीने 6 धावा देत 1 विकेट घेतली. विसेने अशाप्रकारे आपल्या अखेरच्या सामन्यात ऑलराउंड कामगिरी केली.
विराटचा मित्र आणि माजी सहकारी
डेव्हिड विसे हा टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा माजी सहकारी आणि खास मित्र आहे. विसे आयपीएलमध्ये 2 संघांकडून खेळलाय. विसेने केकेआर आणि आरसीबीचं प्रतिनिधित्व केलंय. विसेने आयपीएलमध्ये एकूण 15 सामन्यांमध्ये 127 धावा करण्यासह 16 विकेट्स घेतल्या आहेत. विसेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. मात्र तो जगभरात होणाऱ्या विविध क्रिकेट लीग स्पर्धेत खेळत राहणार आहे.
विसेने नामिबियाला एकहाती अनेक सामने जिंकून दिले आहे. विसेने 15 वनडे मॅचमध्ये 1 अर्धशतकासह 330 धावा केल्या आहेत. तसेच टी 20 क्रिकेटमध्ये 40 डावांमध्ये 624 धावा केल्या आहेत. तसेच 59 विकेट्सही घेतल्या आहेत. विशेष म्हणजे विसे दक्षिण आफ्रिकेकडूनही खेळला आहे.
डेव्हिड विसेचा क्रिकेटला रामराम
The final walk of DAVID WIESE in International cricket. 👏
– Tears in his eyes…!!!! pic.twitter.com/07NshOCTcA
— Johns. (@CricCrazyJohns) June 16, 2024
दरम्यान नामिबियाने या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाने शानदार सुरुवात केली. नामिबियाने ओमानवर विजय मिळवला. मात्र त्यानंतर नामिबियाला सलग 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. नामिबियाला स्कॉटलँड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या 3 संघांनी पराभूत केलं. नामिबियाला स्कॉटलँडने 5 विकेट्स, ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्स आणि इंग्लंडने 41 धावांनी पराभूत केलं.