NZ vs AFG: एकट्या गुरबाजची 80 धावांची खेळी न्यूझीलंडवर भारी, अफगाणिस्तानचा किंवींना 75 रन्सवर गुंडाळत सुपर विजय,आणखी एक उलटफेर
New Zealand vs Afghanistan Match Result: अफगाणिस्तानने न्यूझीलंड क्रिकेट टीमवर 84 धावांनी विजय मिळवत उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानचा हा सलग चौथा विजय ठरला. रहमानउल्लाह गुरुबाज, राशिद खान आणि फझलहक फारुकी हे तिघे अफगाणिस्तानच्या विजयाचे नायक ठरले.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना आणखी एक उलटफेर पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील 14 व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने होते. अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा कित्येकपटीने अनुभवी आणि वरचढ असलेल्या न्यूझीलंडला पराभवाची धुळ चारली आणि उलटफेर केला. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर 84 धावांनी मात केली. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडला या विजयी धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी 15.2 ओव्हरमध्ये 75 धावांवर गुंडाळलं. कॅप्टन राशिद खान आणि फझलहक फारुकी ही जोडी अफगाणिस्तानच्या विजयाची शिल्पकार ठरली. या दोघांनी अफगाणिस्तानसाठी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पहिल्या बॉलपासून झटके द्यायला सुरुवात केली आणिन 75 धावांवर पॅकअप केलं. न्यूझीलंडच्या फिन एलन आणि मायकल ब्रेसवेल दोघेही गोल्डन डक ठरले. या दोघांना खातंही उघडता आलं नाही. न्यूझीलंडच्या 6 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कॅप्टन केन विल्यमसन याने 9, डेव्हॉन कॉनव्हे 8, डॅरेल मिचेल 5, मार्क चॅपमॅन आणि मिचेल सँटनर 4 आणि लॉकी फर्ग्यूसन याने 2 धावा केल्या. ट्रेंट बोल्टने नाबाद 3 धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्स आणि मॅट हॅन्री या दोघांनी न्यूझीलंडसाठी सर्वाधिक अनुक्रमे 18 आणि 12 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून राशिद आणि फझलहक या दोघांव्यतिरिक्त माजी कर्णधार मोहम्मद नबी याने 2 विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तानची बॅटिंग
दरम्यान त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून अगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या पहिल्या 3 फलंदाजांनी अफलातून बॅटिंग करत चांगली सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना त्या सुरुवातीचा फायदा घेत मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही. इब्राहीम झद्रान आणि रहमानुल्लाह गुरुबाज या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. या जोडीने 103 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली.
इब्राहीमने 41 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 44 धावा केल्या. त्यानंतर अझमतुल्लाह याने 22 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. अफगाणिस्तानला न्यूझीलंडने ठराविक अंतराने झटके देत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. मोहम्मद नबी 0 आणि राशिद खान 6 धावा करुन आऊट झाला. दुसऱ्या बाजूला चांगली साथ मिळत नसल्याने गुरुबाजही बॅकफुटवर गेला परिणामी तो ही आऊट झाला. गुरुबाजने 56 चेंडूत 5 सिक्स आणि 5 फोरसह 80 रन्स केल्या. तर त्यानंतर गुलाबदीन यालाही भोपळा फोडता आला नाही. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि मॅट हॅन्री या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्यूसनच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
अफगाणिस्तानचा सलग दुसरा विजय
Afghanistan put on a clinic with bat and ball against New Zealand to continue their winning momentum 🙌#T20WorldCup | #NZvAFG | 📝 https://t.co/v8noS59c1q pic.twitter.com/du3txa6GL0
— ICC (@ICC) June 8, 2024
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन : केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, डेव्होन कॉनव्हे (विकेटकीपर), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मायकल ब्रेसवेल, मिचेल सेंटनर, मॅट हेनरी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन.
अफगानिस्तान प्लेइंग ईलेव्हन : राशिद खान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलबदीन नाईब, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनात, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी.