Pakistan vs Canada: कॅनडा विरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीच्या नावावर नकोसा विक्रम, काय केलं वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या सामन्यात स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

Pakistan vs Canada: कॅनडा विरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीच्या नावावर नकोसा विक्रम, काय केलं वाचा
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 9:56 PM

टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची अस्तित्वाची लढाई सुरु आहे. उरलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळावयचा आहे. त्यामुळे आधीच पाकिस्तानी संघाला टेन्शन आलं आहे. असं असताना कॅनडा विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रीदीच्या नावावर नकोसा विक्रम नोदंवला गेला आहे. या सामन्यात बाबर आझमचा शाहीनवर विश्वास असल्याने पहिलंच षटक त्याच्याकडे सोपवलं. त्याच्याकडून झटपट विकेट्सची अपेक्षा होती. मात्र त्याचा भ्रमनिरास झाला. कॅनेडियन फलंदाजांनी असं काही केलं की शाहीन आफ्रिदीच्या नावावर नको तो विक्रम नोंदवला गेला आहे. कॅनडाकडून आरोन जॉन्सन फलंदाजी करत होता. त्याने पहिल्याच दोन चेंडूवर चौकार ठोकले.

शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर दौन चौकार लगावले आणि नकोसा विक्रम प्रस्थापित झाला. शाहीन आफ्रिदी टी20 वर्ल्डकप क्रिकेट इतिहासातील पहिला असा गोलंदाज ठरला आहे की पहिल्या डावाच्या दोन चेंडूवर चौकार दिले. कॅनडा सारख्या दुबळ्या संघाच्या खेळाडूने अशी कामगिरी केल्याने तोंड लपवण्याची वेळ आली आहे.

इतकंच काय तर सलग दोन चौकार पडल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही संतापला होता. त्याने शाहीन आफ्रिदीला लागलीच खडे बोल सुनावले. चेंडू नेमका कुठे टाकायचा याबाबत इशाऱ्यातून धडाही घेतला. शाहीन आफ्रिदीने 4 षटकं टाकली आणि 21 धावा दिल्या. तसेच फक्त एक विकेट घेण्यात यश आलं. शाहीन आफ्रिदी जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. टी20 क्रिकेट कारकिर्दीत एकूण 68 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात 20.81 सरासरीने आणि 7.73 इकोनॉमी रेटने 92 गडी बाद केले आहेत. दरम्यान, कॅनडाने 20 षटकात 7 गडी गमवून 106 धावा केल्या आणि विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कॅनडा (प्लेइंग इलेव्हन): आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.