Video: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गडबड, एका रुमालामुळे हातात आलेली विकेट गेली

| Updated on: Oct 04, 2024 | 2:32 PM

Women’s T20 World Cup Sri Lanka vs Pakistan: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील दोन सामने पार पडले आहेत. पहिल्या सामन्यात बांगलादेशने, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे. असं असलं तरी, पाकिस्तान श्रीलंका सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. एका रुमालामुळे पाकिस्तानच्या हातात आलेली विकेट गेली.

Video: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गडबड, एका रुमालामुळे हातात आलेली विकेट गेली
Image Credit source: (Photo: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images)
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामने आता एक एक करून होत आहेत. जय पराजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. असं असताना पाकिस्तान श्रीलंका सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 116 धावा केल्या आणि विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंकेला काही गाठता आलं नाही. 20 षटकात 9 गडी गमवून 85 धावा करता आल्या. पाकिस्तानने श्रीलंकेला 31 धावांनी पराभूत केलं. पण या सामन्यात पाकिस्तानच्या हातात आलेली विकेट गमवण्याची वेळ आली. एका रुमालामुळे पाकिस्तानला या विकेटवर पाणी सोडावं लागलं. या प्रकारानंतर बराच गोंधळ पाहायला मिळाला. झालं असं की, नाशरा संधुच्या गोलंदाजीवर श्रीलंकेची फलंदाज निलाक्षी डीसिल्वा बाद झाली होती. पण त्यानंतर लगेचच पंचांनी नियम बदलत डेड बॉल दिला. कराण गोलंदाजी करताना नाशरा संधुचा रुमाल पडला होता. यामुळे निलाक्षीची विकेट वाचली. पंचांच्या या निर्णयानंतर बराच वादंग झाला.

पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 117 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या 12 षटकात 4 विकेट गमवून 51 धावा झाल्या होत्या. पाकिस्तानकडून 13वं षटक टाकण्यासाठी नाशरा संधु आली होती. स्ट्राईकला निलाक्षी डिसिल्वा होती. यावेळी नताशाने पहिलाच चेंडू टाकला आणि निलाक्षीने स्वीप मारण्याच प्रयत्न केला. मात्र चेंडू हुकला आणि थेट पॅडला लागला. यानंतर जोरदार अपील झाली आणि पंचांनी पायचीत असल्याचं घोषित केलं. नेमकं तेव्हाच तिने पंचांकडे रुमाल पडल्याची तक्रार केली. तेव्हा मैदानातील पंचांनी थेट तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तेव्हा हा चेंडू डेड बॉल असल्याचं घोषित करण्यात आलं. मात्र या निर्णयानंतर बराच गोंधळ झाला.

एमसीसीच्या नियमानुसार 20.4.2.6 मध्ये याबाबत स्पष्ट केलं आहे की, स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज चेंडू खेळता जर काही आवाज किंवा हालचाल झाली आणि त्याचं लक्ष विचलीत झालं तर तो डेड बॉल दिला जाईल. निलाक्षीच्या बाबतीत असंच घडलं. शॉट खेळताना रुमाल पडला आणि त्याचा फायदा निलाक्षीने घेतला. पण ती फार काही चांगलं करू शकली नाही. निलाक्षी 25 चेंडूत 22 धावा करून बाद झाली. असाच प्रकार काउंटी क्रिकेटमध्ये काही दिवसांपूर्वी झाला होता. समरसेट आणि हॅम्पशर यांच्यातील सामन्यात काइल एबॉटच्या चेंडूवर शोएब बशीर बोल्ड झाला होता. पण एबॉटचा रुमाल पडल्याने चेंडू डेड असल्याचं घोषित केलं गेलं. त्यामुळे आऊट असूनही खेळण्याची संधी मिळाली.