IND vs SA Final : जिंकलो ना भावा, वर्ल्ड कप जिंकताच रोहित आणि विराटची ‘जादू की झप्पी’, Video तुफान व्हायरल

Rohit Sharma & Virat Kohli : टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला असून सामना झाल्यावर कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघांनी एकमेकांना कडाडून मिठी मारली.

IND vs SA Final : जिंकलो ना भावा, वर्ल्ड कप जिंकताच रोहित आणि विराटची 'जादू की झप्पी', Video तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 12:53 AM

टी-20 वर्ल्ड कप 2024 फायनलच्या श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात  टीम इंडियाने आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या शिलेदारांनी आयसीसी ट्रॉफीचा 13 वर्षांचा दुष्काळ संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण टीमने दमदार कामगिरी केली. सामना टीम इंडियाच्या हातातून गेला होता. चतुर कॅप्टन रोहितने गोलंदाजांना योग्य प्रकारे वापर करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाने वर्ल्ड जिंकल्यावर मैदानात रोहित शर्मा आणि किंग विराट कोहली यांनी  एकमेकांना मिठी मारली, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम इंडियासाठी रोहित शर्माने आतापर्यंत नऊ तर विराट कोहलीने सहा वर्ल्ड कप खेळले आहेत. दोघांसाठी मोठा कालावधी होता परंतु शेवटपर्यंत त्यांनी हार मानली नाही. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक आयसीसी ट्रॉफी नसल्याने त्यांच्या रेकॉर्डवर पाणी फेरल्यासारखं होतं. आता ही कमी भरून निघली आहे. टी-२० चा पहिला वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला त्या संघाचा रोहित शर्मा भाग होता. तेव्हापासून रोहित खेळला खरा पण टीम इंडिया एकदाही ट्रॉफी जिंकू शकली नव्हती. विराट, रोहित, बुमराहसारखे मोठे खेळाडू असूनही आयसीसी ट्रॉफी जिंकत आली नाही यावरून टीम इंडियाला हिणवलं जायचं. मात्र आता टी-२० वर्ल्ड कप जिंकल्याने टीकाकारांच्या तोंडाला कुलुप लागणार आहे.

पाहा व्हिडीओ:

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.