IND vs PAK : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी, कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार!

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही तासात सुरुवात होईल. या स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याची आतापासून चर्चा रंगली आहे. हा सामना पाहण्यासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पण या सामन्यापूर्वीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसेल.

IND vs PAK : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी, कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार!
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 6:51 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना अवघ्या काही तासात सुरु होईल. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना होणार आहे. असं असताना सर्वांना वेध लागले आहेत ते 9 जूनला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याचे..कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी कोट्यवधी क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज सामना म्हणून याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे हा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडेल अशी अपेक्षा आहे. पण हा अंदाज काही अंशी फोल ठरला तर आश्चर्य वाटायला नको. कारण भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री पूर्णपणे झालेली नाही. आयसीसी वेबसाईटवर अजूनही तिकीटे उपलब्ध आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एकीकडे हायव्होल्टेज सामना असताना आणि दोन्ही संघांचा मोठा फॅनबेस असताना अजूनही तिकीट विक्री न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री सुरु झाली की काही तासातच हाऊसफूल होते. पण यावेळेस चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळत आहे. तिकीट विक्री न झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण याचं प्रमुख कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त महाग आहेत. आयसीसीने तीन टप्प्यात तिकीट विक्री ठेवली आहे. यात डायमंड क्लब, प्रीमियम कल्ब लाउंज आणि कॉर्नर क्लब यांचा समावेश आहे.

डायमंड क्लब तिकिटाची विक्री करणाऱ्या चाहत्यांना मैदानात चांगली सुविधा मिळेल. पण यासाठी चाहत्यांना एका तिकिटासाठी 8.34 लाख रुपये मोजावे लागतील. प्रीमियम क्लब लाउंजच्या तिकिटाची रक्कम ही 2 लाख रुपये, कॉर्नर क्लबची तिकिटाची किंमत 2029 लाख रुपये आहे. भारत पाकिस्तान सामना असल्याने वाटेल ती किंमत चाहते मोजतील असं आयसीसीला वाटलं होतं. पण भलतंच काहीतरी घडलं आहे. महागडं तिकीट पाहून अनेकांनी पाठ फिरवलं आहे. त्यामुळे आयसीसी तिकिटांचे दर कमी करते का? की सामन्यात रिकाम्या जागांचं दर्शन घडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची एकूण खेळाडू

भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराटकोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हार्द‍िक पंड्या, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.

पाकिस्तान टीम: बाबर आजम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमां, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सैम अयूब, शादाब खान, शाहीन शाह आफरीदी आणि उस्मान खान.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.