IND vs BAN Head To Head: टीम इंडियाची बांगलादेश विरुद्ध आकडेवारी कशी?

India vs Bangladesh Head To Head Record: बांगलादेशची टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया विरुद्ध कशी राहिलीय आकडेवारी? जाणून घ्या.

IND vs BAN Head To Head: टीम इंडियाची बांगलादेश विरुद्ध आकडेवारी कशी?
rohit sharma ind vs ban
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 7:13 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 47 वा आणि सुपर 8 मधील सातव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहे. हा सामना 22 जून रोजी एटींग्वा येथील सर व्हीव्हीएन रिचर्ड्स स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 8 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा या सामन्यात विजय मिळवून सेमी फायनलमध्ये पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला बांगलादेश सुपर 8 मधील पहिल्या पराभवानंतर कमबॅकच्या शोधातअसणार आहे. टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात एकमेकांविरुद्ध टी 20 फॉर्मेटमध्ये आकडेवारी कशी आहे? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया सरस

टी 20आय फॉर्मेटमध्ये टी इंडिया बांगलादेशवर वरचढ राहिली आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 सामने झाले आहेत. टीम इंडियाने 13 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला केवळ 1 सामनाच जिंकता आला आहे. तसेच टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघात 4 सामने झाले आहेत. या चारही सामन्यात टीम इंडियाच विजयी राहिली आहे. त्यामुळे एकूणच टीम इंडियाचाच बोलबाला राहिला आहे.

दरम्यान टीम इंडियाने सुपर 8 मध्ये अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय मिळवला. तर त्याआधी टीम इंडियाने साखळी फेरीत आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसएवर मात केली होती. तर कॅनडा विरुद्धचा सामना रद्द झाला. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेचा अपवाद वगळता श्रीलंका, नेदरलँड्स आणि नेपाळवर विजय मिळवला. मात्र सुपर 8 मध्ये पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला पराभूत केलं.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

बांग्लादेश क्रिकेट टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), शकिब अल हसन, तॉहीद ह्रदोय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, जाकेर अली, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम आणि सौम्या सरकार.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.